Type Here to Get Search Results !

जाणाता राजा सुवर्णकार व्यापारी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा : राजाराम देशमुख ; लवकरच झवेरी बाझार येथे भेट देऊन सर्व गलाई व्यवसाईक व सुवर्णकार व्यापारी, कामगार बांधवांशी संवाद साधणार


जाणाता राजा सुवर्णकार व्यापारी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा : राजाराम देशमुख
लवकरच झवेरी बाझार येथे भेट देऊन सर्व गलाई व्यवसाईक व सुवर्णकार व्यापारी, कामगार बांधवांशी संवाद साधणार
माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : गलाई एकता असोसिएशनचे (गोल्ड स्मिथ कॉडिनेशन कमिटी) अध्यक्ष राजाराम देशमुख यांनी शरदचंद्रजी पवार साहेबांची घेतली. भेट या भेटी दरम्यान पवार साहेबांनी केंद्र सरकारने केलेली नोटबंदी, चुकीच्या पद्धतीने लागू केलेली जी.एस.टी., भांडवलदारधार्जिण आर्थिक धोरणांमुळे सर्व प्रमुख क्षेत्रा सोबतच सोन्या-चांदीच्या व्यापारात प्रचंड मोठ्या प्रमाणात आलेली आर्थिक मंदी व या मुळे झवेरी बाझार येथील गलाई व्यवसाईक, सुवर्णकार कामगार व व्यापारी यांच्या व्यवसाय व रोजगारा वरती नेमके काय-काय परीणाम झाले आहेत याची सखोल विचारपूस केली.
सोन्याच्या व्यापाराशी निगडीत असणारया क्षेत्रातील सर्व व्यापारी बांधवांना पवार साहेबांनी वेळो वेळी सहकार्य व मार्गदर्शन केले आहे. कांही वर्षापुर्वी केंद्र सरकारने अगदी शुल्लक कारणे देत देशातील अनेक शहरातील जवळपास पन्नास हाॅलमार्किंग सेंटर सिल (बंद) केली होती.त्या वेळी मा.पवार साहेबांनी या सर्व हाॅलमार्किंग सेंटर व्यवसायिकांना धीर देत संबंधित खात्यातील मंत्री व अधिकारयांची बोलणी करून ही बंद केलेली सर्व हाॅलमार्किंग सेंटर पुन्हा सुरू करून देण्यास व संबंधित क्षेत्रातील असंख्य गलाई व सुवर्णकार व्यापारी व कामगारांना बेरोजगार होण्यापासून वाचविण्यात मा.पवार साहेबांनी अत्यंत मोलाचे सहकार्य केले होते.
केंद्रातील भाजपा सरकार व या पुर्वीचे महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजपा सरकारने दररोज जवळपास 150 ते 200 कोटी रूपयांची देशातील सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असणारे झवेरी बाझार इतरत्र हलविण्याचा घाट घातला होता. पण यावेळी देखील पवार साहेबांनी मुंबई व किंबहुना देशाच्या आर्थिक उलाढालीचा कणा असणारे झवेरी बाझार इतरत्र कोठेही स्थलांतरीत करू देणार नाही असे ठणकावून सांगत भाजपा सरकारचा झवेरी बाजार इतरत्र स्थलांतरीत करण्याचा डाव हाणून पाडला व झवेरी बाझार मार्केट मधील सर्व गलाई व्यवसाईक, सुवर्णकार व्यापारी व कामगारांना दिलासा देण्याचे काम केले आहे. 
पवार साहेबांनी राजाराम देशमुख यांच्याशी संवाद साधतेवेळी सोन्याच्या व्यापाराशी निगडीत असणाऱ्या सर्व क्षेत्रांना येणाऱ्या काळात या पुर्वी प्रमाणे चांगली उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने नेमक्या कोणत्या उपाययोजना करायला हव्या याची देखील माहिती घेतली व झवेरी बाझार येथील तमाम गलाई व्यवसाईक व सुवर्णकार व्यापारी, कामगारांच्या प्रमुख समस्या सोडविण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी असेल असे आश्वासन राजारामदेशमुख यांना दिले. 
लवकरच शरदचंद्रजी पवार साहेब झवेरी बाझार येथे भेट देऊन सर्व गलाई व्यवसाईक व सुवर्णकार व्यापारी, कामगार बांधवांशी संवाद साधणार आहेत. 


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies