दुचाकीला आकर्षक नंबर पाहिजे... ; 27 फेब्रुवारी रोजी अर्ज करा ; मिळणार आकर्षक नंबर 

दुचाकीला आकर्षक नंबर पाहिजे... ; 27 फेब्रुवारी रोजी अर्ज करा ; मिळणार आकर्षक नंबर 


दुचाकीला आकर्षक नंबर पाहिजे...
27 फेब्रुवारी रोजी अर्ज करा ; मिळणार आकर्षक नंबर 
माणदेश एक्स्प्रेस न्युज
सांगली : उप प्रादेशिक परिवाहन कार्यालय, सांगली या कार्यालयात लवकरच खाजगी दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली येथे मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते व त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो. नागरिकांना पसंती नुसार आकर्षक नोंदणी क्रमांक सुलभतेने मिळावा यासाठी वाहनधारकांनी नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी वाहनासाठीच्या मालिकेतील आकर्षक तसेच पसंती क्रमांक आरक्षित करण्यासाठी दिनांक 27 फेब्रुवारी रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते 2 या दरम्यान विहीत नमुन्यात अर्ज व विहीत शुल्क जमा करावे,  असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यांनी केले आहे. 
अर्ज उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डीडी, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅन कार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा. सदर डीडी Dy RTO Sangli यांच्या नावे, राष्ट्रीयकृत बँकेचा असावा त्यासोबत अर्जदारास पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य राहील. अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 5 अ मध्ये विहीत केलेल्या पत्त्याच्या पुराव्याची साक्षंकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. उदा. लाईटबिल, टेलिफोन बिल इत्यादी. अर्जदाराची ओळख पटविण्यासाठी अर्जासोबत अर्जदाराने त्याचे फोटो ओळखपत्र उदा आधारकार्ड / निवडणूक आयोगाचे ओळखपत्र/पासपोर्ट/पॅनकार्ड इत्यादीची साक्षांकित प्रत सादर करावी लागेल.
 एकाच नंबरकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास लिलाव प्रक्रिया पार पाडण्यात येईल. सदरच्या लिलावाकरीता अर्जदारांना दुसऱ्या दिवशी पूर्वी जमा केलेल्या डी.डी. शिवाय ऐच्छिक जास्त रककमेचा डीडी सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा लागेल व त्याच दिवशी संबंधित अर्जदाराच्या समोर लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रक्कमेचा डी.डी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल. 
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बलदून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकारजमा होईल. विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रधान केलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही, 


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a comment

0 Comments