शहीद अशोक कामटे यांची ५५ वी जयंती सांगोल्यात साजरी 


शहीद अशोक कामटे यांची ५५ वी जयंती सांगोल्यात साजरी 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगोला : सांगोल्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या शहीद अशोक कामटे बहुद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने शहीद अशोक कामटे यांची ५५ वी जयंती  उत्साहात साजरी करण्यात आली. स्टेशन रोड येथील तोरणा मुख्यालयात अशोक कामटे यांच्या प्रतिमेचे पुजन सांगोला पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रताप वसगडे यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आले. नगरसेवक सुरेशआप्पा माळी,पत्रकार राजेंद्र यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अध्यक्ष संतोष महिमकर,अच्युत फुले,चैतन्य राऊत, पिंटू दिवटे, संदीप बनकर, वीर रणदिवे, पवन शिंदे, हर्षवर्धन चव्हाण, विठ्ठलपंत शिंदे, सोमनाथ सपाटे, चारुदत्त खडतरे, शहाजी पाटील, महेश माळी, मयुरेश गुरव, बाळासाहेब बनकर, आशिष जाधव, ओंकार सपाटे, महादेव जाधव यांच्यासह संघटनेच्या सर्व  सदस्यांनी अशोक कामटे जयंतीनिमित्त अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन नीलकंठ शिंदे यांनी केले.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured