श्रीराम बहुउद्देशिय सेवाभावी संकुलामध्ये दीक्षांत समारंभ कार्यक्रम संपन्न

श्रीराम बहुउद्देशिय सेवाभावी संकुलामध्ये दीक्षांत समारंभ कार्यक्रम संपन्नमाणदेश एक्स्प्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : श्रीराम बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, आटपाडी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, व    श्री.तानाजीराव पाटील शिक्षणशास्त्र महाविद्यालय, आटपाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठाचा 56 वा व महाविद्यालयाचा दुसरा पदवीदान समारंभ श्रीराम बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, सांस्कृतिक हॉल, येथे बुधवार दि. 26 रोजी संपन्न झाला. 
सकाळी 10.00 वा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  प्रा. डॉ. मनोज गुजर, डॉ.श्रीनाथ पाटील, मुन्नाभाई तांबोळी, प्रा.डॉ.विजयकुमार पाटील, प्रा. महादेव होनकळस, प्रा. सचिन सरक, प्रा.अभिजीत गिरी, यांच्या हस्ते दीप करण्यात आले. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाचा 56 वा व कला व विज्ञान महाविद्यालय, व श्री.तानाजीराव पाटील शिक्षणशास्त्र महाविद्यालय द्वितीय दीक्षांत समारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी केले. 
युजीसी व महाराश्ट्र शासन यांच्या आदेशानुसार पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ महाविद्यालयात आयोजित केलेचे सांगितले व संस्थेची आजपर्यत झालेली प्रगती, शाखा विस्तार, आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सेवासुविधा बाबत विचार मांडून विद्यार्थ्यांनी फक्त पदवी शिक्षण घेवूनच न थांबता पुढील शिक्षणही पूर्ण करून जीवनामध्ये यशस्वी नागरिक बनावे असे आहवान केले. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व प्रमुख अतिथी प्रा. डॉ. मनोज गुजर, सिनेट सदस्य शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर प्रमुख उपस्थित डॉ. श्रीनाथ पाटील यांचा सत्कार करण्यात आला. समारंभाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष मुन्नाभाई तांबोळी होते. प्रा. डॉ. मनोज गुजर यांनी जे स्तानक विद्यार्थी, विद्यार्थीनी पदवी घेणार आहेत त्यांचे अभिनंदन केले आणि विद्यार्थ्यांनी भावी जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रमाणिकपणे अभ्यास करून यश संपादन करावे असा कानमंत्र दिला.  तसेच अपयशाने खचून न जाता जीवनाकडे बघण्याचा दृश्टीकोन सकारात्मक करावा असे आहवान केले. तर डॉ. श्रीनाथ पाटील यांनी विद्यार्थ्यांना अंधश्रध्देपासून दूर रहावे. तसेच आपण नियमित व्यायाम करून आपले शरीर निरोगी राखण्याचा सल्ला दिला. यानंतर कला व विज्ञान महाविद्यालय, व श्री.तानाजीराव पाटील शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील उपस्थित स्तानक विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. प्रा. महादेव होनकळस यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured