इंदुरीकर महाराजांची बदनामी थांबवा ; आटपाडी तालुका वारकरी संप्रदाय संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन


इंदुरीकर महाराजांची बदनामी थांबवा 
आटपाडी तालुका वारकरी संप्रदाय संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : गेल्या काही दिवसापासून हभप इंदुरीकर महाराज यांच्या बद्दल सम तारीख व विषम तारीख याबाबत केलेल्या विधानाचा सर्व स्तरातून टीका होत आहे. परंतु त्यांनी केलेले विधान हे गुरुचरित्र अध्यायातील ३७ व्या अध्यायामध्ये आहे. त्यामध्ये कोणताही दोष नाही पण काही धर्म समाजकंटक व लोक हेतू परस्पर वारकरी संप्रदाय वरती टीका करून त्यांच्यावर खोटे आरोप करत नाहक बदनाम करीत असून हे आम्ही सहन करणार नसल्याचा इशारा आटपाडी तालुका वारकरी संप्रदायच्या वतीने देण्यात आला असून याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी अनिल डुबले, विजयसिह लक्ष्मणराव पाटील, जगन्नाथ कृष्णा कदम, नवनाथ कोंडीबा कदम, रामचंद्र नारायण फडतरे, बाळासाहेब जगन्नाथ भोसले, सोमनाथ हरिदास कुंभार, सुर्यकांत शंकर देशमुख, भारत घेरडे, संजय जावीर, रघुनाथ सागर, रमेश टकले, शशिकांत दौंडे व मान्यवर उपस्थित होते. 


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured