सावधान भारतात अध्यक्षीय लोकशाही येत आहे....!


सावधान भारतात अध्यक्षीय लोकशाही येत आहे....!
सोमवार दि.  24 फेब्रुवारी, 2020 रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला भेट दिली. अहमदाबाद येथील विमानतळावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय प्रेमाने त्यांचे स्वागत केले. त्यानंतर नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी नथुराम गोडसे यांच्या स्मारकास भेट देण्याऐवजी साबरमती आश्रमाला भेट देऊन महात्मा गांधीजींना आदरांजली वाहिली. साबरमती आश्रमात ' व्हिजिटर्स' बुकमध्ये अभिप्राय लिहिताना डोनाल्ड ट्रम्प यांनी महात्मा गांधी चा उल्लेख टाळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख व कौतुक केले . त्यानंतर मोटेरा स्टेडियम पर्यंत रोडशोचे आयोजन केले होते. त्या रोडशो मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे सोबत फक्त नरेंद्र मोदीच सहभागी झाले होते. मोटेरा स्टेडियम वर आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी, फक्त इस्लामिक दहशतवादापासून ( इतर धर्मीयांचा दहशतवाद सोडून ) संरक्षण करण्यास भारत आणि अमेरिका कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, दक्षिण आशियात लवकरच शांतता (?) निर्माण होईल व भारतात शांतता निर्माण करण्याची जबाबदारी भारतातील सरकारची असेल. आम्ही भारताला नवीन शस्त्रे देणार आहोत,असे अश्वासन ही दिले. आपल्या 27 मिनिटाच्या भाषणांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पन्नास वेळा भारताचे नाव घेतले, तर 13 वेळा फक्त नरेंद्र मोदींचे नाव घेतले. नरेंद्र मोदी यांनीही आपल्या 21 मिनिटांच्या भाषणात 29 वेळा अमेरिकेचे नाव घेतले, तर 22 वेळा डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचा उल्लेख केला. आपल्या 20 मिनिटांच्या भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले की, ' भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू होत असताना नव्या संबंधांचा, आव्हानांचा, संधीचा आणि बदलाचा पाया रचला जात आहे.ते पुढे असेही म्हणाले की, ' :वरील विश्वास हे दोन्ही देशांचे (? ) सामर्थ्य आहे.'  एकंदरीत डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या 27 मिनिटांच्या भाषणात भारताच्या विकासावर बोलण्यासाठी चार मिनिटे वेळ दिला तर नरेंद्र मोदी यांचे कौतुक पाच मिनिटे तर भारत व अमेरिका मैत्री (डोनाल्ड ट्रम्प व नरेंद्र मोदी यांची मैत्री) या विषयावर दहा मिनिटे बोलले. नरेंद्र मोदी आपल्या 23 मिनिटांच्या भाषणात भारताच्या विकासावर पाच मिनिटे डोनाल्ड ट्रम्प व त्यांच्या कुटुंबीयां विषयी चार मिनिटे व भारत-अमेरिका मैत्री विषयी 13 मिनिटे बोलले. या सर्व घडामोडींचा थोडा बारकाईने अभ्यास केला तर काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्याशिवाय राहत नाहीत.  डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा हा दोन देशांच्या विकासासाठी होता,  की नरेंद्र मोदी व डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी होता? मोदी व ट्रम्प यांची ही भेट व्यक्तिगत व कौटुंबिक  भेट होती, की देशाच्या विकासासाठी होती? कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तावीस मिनिटाच्या भाषणात देश विकासासाठी केवळ चार मिनिटे दिली तर नरेंद्र मोदी यांच्या कौतुकासाठी पाच मिनिटे वेळ दिला. दोघांच्या मैत्री वर बोलण्यासाठी दहा मिनिटे वेळ दिला. म्हणजे देशाच्या विकासासाठी केवळ चार मिनिटे वेळ दिला जातो व नरेंद्र मोदी व मैत्री या विषयावर बोलण्यासाठी पंधरा मिनिटे वेळ दिला जातो. सदर भेट दोन्ही देशांच्या विकासाची असती तर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या विकासावर बोलण्यासाठी जास्त वेळ द्यायला हवा होता. व नरेंद्र मोदी व त्यांच्या मैत्री वर बोलण्यासाठी कमी वेळ द्यायला हवा होता . म्हणजे यांना  देशाचा विकास महत्त्वाचा नव्हता, तर नरेंद्र मोदी व त्यांची मैत्री महत्त्वाची होती असे वाटते. तीच स्थिती नरेंद्र मोदी यांची आहे. आपल्या तेवीस मिनिटाच्या भाषणांमध्ये देशाच्या विकासावर  पाच मिनिटे, तर डोनाल्ड ट्रम्प व मैत्री या विषयावर चौदा मिनिटे बोलले . म्हणजेच या दोघांची ही भेट आपल्या राष्ट्राच्या तिजोरीतला पैसा खर्च करून  व्यक्तिगत स्वार्थासाठी होती असेच वाटते. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी फक्त मोदीचे गोडवे गायले, तर त्यांचे भविष्य, पक्ष, विचारधारा व पद  इत्यादी सुरक्षित राहण्यास मदत होईल . काही दिवसांपूर्वी जेव्हा नरेंद्र मोदी अमेरिकेला गेले होते, तेव्हा त्यांनीही अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचे अतिशय कौतुक केले होते. मीडियाने ही बाब डोनाल्ड ट्रम्प यांचा राजकीय प्रचार अशा अर्थाने घेतली होती, कारण थोड्याच दिवसात अमेरिकेच्या निवडणुका लागणार आहेत. या निवडणूकीत जिंकण्यासाठी अमेरिकेतील भारतीय वंशाच्या दहा लाख मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, याची पायाभरणी नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचार करुन केली. भविष्यात भारतातील संसदीय लोकशाही ची निवडणूक मोदी व त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने कठीण आहे, कारण संपूर्ण देशात ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याच बरोबर न्यायव्यवस्था, रिझर्व बँक, निवडणूक आयोग, संरक्षण यंत्रणा या सर्वांना त्यांनी स्वतःच्या नियंत्रणाखाली ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांनी साम-दाम-दंड-भेद, दहशत इत्यादी गोष्टींचा वापरही करण्यास सुरुवात केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागताला व  कार्यक्रमाला मोदीने विरोधीपक्ष, किंवा त्या पक्षांच्या सदस्यांना निमंत्रित केलेलं दिसत नाही. या संपूर्ण भेटीमध्ये मोदींच्या शिवाय इतर कोणत्याही महत्त्वाच्या व्यक्तीचा सहभाग निदर्शनास येत नाही. जर हा ट्रम्प यांचा दौरा दोन देशांच्या विकासासाठी  असता तर मोदीने लोकसभेचे सदस्य व पदाधिकारी, राज्यसभेचे सदस्य  व पदाधिकारी, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांना या कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेतले असते . या भेटीमध्ये राष्ट्रपतीच्या व उपराष्ट्रपती नावाचा कुठे उल्लेख सुद्धा आढळत नाही. मग फक्त नरेंद्र मोदी हेच या देशाचे मालक आहेत काय? शिवाय नरेंद्र मोदी यांचा व त्यांच्या विचारधारेचा आदर्श, नथुराम गोडसे असताना, त्यांनी साबरमती येथील महात्मा गांधीजींच्या आश्रमाला भेट का दिली असावी?  म्हणजे यांचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी व त्यांच्या पक्षाचे वागणे, विचारधारा व कार्य  वेगळे आहे आणि भारतामध्ये त्यांचे विचार, कार्य व वर्तन वेगळे आहेत. डोनाल्ड ट्रम्प साबरमती आश्रमातील 'व्हिजिटर्स बुकमध्ये' गांधीजींचा उल्लेख करत नाहीत, मात्र  नरेंद्र मोदी यांचे तोंड भरून कौतुक केले जाते, असे का? कदाचित भारतातील संसदीय लोकशाही जिंकणे मोदींना भविष्यात सोपे जाणार नाही, म्हणून ट्रम्प साहेब यांच्या मदतीने व मैत्रीच्या आधारे भारतात अमेरिकेसारखी  अध्यक्षीय लोकशाही आणण्याचा विचार तर करत नाहीत ना? असा प्रश्न निर्माण होतो.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured