सांगोला तालुका समन्यायी पाणी वाटपाची आढावा बैठक सांगली येथे संपन्न ; डॉ. भारत पाटणकर व आनंदराव पाटील याचं प्रमुख उपस्थिती 


सांगोला तालुका समन्यायी पाणी वाटपाची आढावा बैठक सांगली येथे संपन्न 
डॉ. भारत पाटणकर व आनंदराव पाटील याचं प्रमुख उपस्थिती 
आटपाडी/प्रतिनिधी : अत्यंत नियोजनबद्ध पणे चालू असलेल्या सांगोला तालुका समन्यायी पाणी वाटपाची नियोजित बैठक सांगली येथील जपलसंपदा विभागाच्या कार्यालयात पार पडली. यावेळी डॉ. भारत पाटणकर यांनी आनंदराव पाटील यांच्या उपस्थितीत सांगोला तालुका समन्यायीच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला, सोबतच आटपाडी व तासगाव तालुक्यांचच्या समन्यायीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. कार्यकारी अभियंता सचिन पवार यांनी आयोजित केलेल्या बैठकीसाठी कार्यकारी अभियंता हरगुडे, कार्यकारी अभियंता पाटील व कार्यकारी अभियंता श्री चिले उपस्थित होते. सांगोला तालुक्याच्या कामामध्ये वेगाने प्रगती होताना दिसून आली. त्यासाठी आवश्यक असणारी माहिती देण्यासाठी यावेळी तालुका कृषी अधिकारी सौ जाधव, जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाचे श्री गुंड, श्री सरगर, उजनी विभागाचे श्री सुरणीस, श्री कुंभार उपस्थित होत. विविध विभागाची माहिती कार्यकारी अभियंत्यांना हस्तांतरित करण्यात आली असून फक्त सांगोला तहसील कार्यालयाकडून  काही माहिती येणे बाकी असल्याचे समजले. तहसील कार्यालयाकडून यावर स्पष्टीकरण देण्यासाठी कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते. 
सचिन पवार यांनी माहिती देताना तालुक्यातील 104 गावांना  कसे आणि कुठल्या योजनेतून पाणी देता येईल याचा ढोबळ आराखडा सादर केला. संबंधित वितरण व्यवस्था उभारताना आणखी काही गोष्टींच्या अभ्यास होणे बाकी असल्याचे सांगितले. सदर आराखड्यामध्ये नैसर्गिक प्रवाहाने पाणी देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे तसेच उंचावरील क्षेत्रला पाणी देण्यासाठी उचल पाणी योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील कुठल्याही गावाचे लागवडी योग्य क्षेत्र यातून वंचित राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे.
 आतापर्यंत झालेल्या प्रगतीविषयी डॉ. भारत पाटणकर यांनी समाधान व्यक्त केले. बैठकीमध्ये सहभागी झालेल्या शिष्टमंडळांमध्ये  गणेश बाबर, माजी सैनिक शिवाजी बाबर, भागवत बाबर, राहुल बाबर, किरण बाबर, विकास बाबर यांचा समावेश होता.
दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured