ॲट्रॉसिटीच्या सुनावण्या जलदगती न्यायालयात घ्या  ; संदेश भंडारे ;  जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती बैठक संपन्न

ॲट्रॉसिटीच्या सुनावण्या जलदगती न्यायालयात घ्या  ; संदेश भंडारे ;  जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती बैठक संपन्न


ॲट्रॉसिटीच्या सुनावण्या जलदगती न्यायालयात घ्या 
संदेश भंडारे ;  जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न
माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : जिल्ह्यातील गेल्या दोन वर्षापासूनच्या पेंडिंग ॲट्रॉसिटीच्या केसेसच्या सुनावण्या जलदगती न्यायालयात घ्या अशा सूचना जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य संदेश भंडारे यांनी केल्या. अतिरिक्त जिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली, बैठकीस समाज कल्याण आयुक्त अर्जुन बन्ने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय  साळुंखे, उपविभागीय पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, सुरेश दुधगांवकर आदी उपस्थित होते. 
संदेश भंडारे म्हणाले,  पोलिसांचा तपास संथ गतीने असून आरोपीना अटक करण्यात दिरंगाई दिसून येते. तसेच फिर्यादीचे जातीचे दाखले मिळत नसल्याचे कारण दाखवून आरोपपत्र कोर्टात दाखल करण्यात विलंब होत आहे. अनेकदा पोलिस प्रशासनाला सूचना देवूनही अंमलबजावणी होत नाही. जातीवाचक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाली असून अत्याचार कमी करण्यासाठी नवा ॲट्रॉसिटी कायदा कार्यशाळा घेण्याची आवश्यकता असल्याची मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. खुन व बलात्काराच्या केसेस जलदगती न्यायालयात घ्यायला पाहिजेत परंतु त्यावर कारवाई होत नाही याबाबत नाराजी व्यक्त केली.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a comment

0 Comments