देश घडवण्याची ताकद एन.एस.एस. च्या स्वयंसेवकांमध्ये : सौ.दीपा बापट

देश घडवण्याची ताकद एन.एस.एस. च्या स्वयंसेवकांमध्ये : सौ.दीपा बापट

 


देश घडवण्याची ताकद एन.एस.एस. च्या स्वयंसेवकांमध्ये : सौ.दीपा बापट
माणदेश एक्सप्रेस न्युज
तासगाव : महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीची दिशा ठरत असते. जे विद्यार्थी महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी होतात, त्यांचे भविष्य उज्ज्वल असते. कारण देश घडवण्याची ताकद फक्त एन.एस.एस.च्या स्वयंसेवकामध्ये असते असे प्रतिपादन तासगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ.दीपा बापट यांनी केले. सावर्डे येथील विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप समारंभात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते संभाजीतात्या पाटील तर प्रमुख उपस्थिती म्हणून तासगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉ.विजय सावंत होते. 
दि. २ जानेवारी २०२०पासून सुरू झालेल्या या शिबिरास अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेटी दिल्या. न्यायमूर्ती विश्वास माने, ॲड. अमोल डोंबे, अॅड.कुलदीप कदम, सांगली चे उपवनसंरक्षक प्रमोद धानके, यशदा संस्थेच्या प्राध्यापिका डॉ. सीमा यशवंत निकम, प्रा.डॉ.डी.बी.थोरबोले, तासगाव येथील आर्ट ऑफ लिव्हिंगचे वाल्मीक खैरनार व श्री. कांबळे, शिवचरित्राचे गाढे अभ्यासक प्रा.अरुण घोडके, ,डॉ.उदय लोखंडे, लोकमतचे उपसंपादक तानाजी जाधव, पाणी फाऊंडेशनचे सत्यवान देशमुख, ज्येष्ठ उद्योजक सुनील गोयल, डॉ.स.एस.पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत इत्यादींनी शिबिरामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या शिबिरासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, सावर्डे गावचे सरपंच प्रदीप माने व त्यांचे सर्व सहकारी उपसरपंच तानाजी माने, राजाराम माने, विश्वास पाटील, अॅड.स्वप्नील पाटील, अजिंक्य माने, पवन जाधव, सर्जेराव गुरुजी, शैलेंद्र पाटील, बाळासाहेब जवळेकर, रवींद्र माने, वसंत माने,  मोहन माने, नवलाई कोळी, आरती दीपक पाटील, सविता कांबळे, सविता माने तसेच महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.तातोबा बदामे, डॉ.अमोल सोनवले, डॉ.परशुराम तेली,  प्रा.कीर्ती कोलप, डॉ.मेघा पाटील, श्री.दिनकर मोरे, श्री.प्रकाश बुकशेठ या सर्वांनी मेहनत घेतली. या शिबिरासाठी १६० विद्यार्थी-विद्यार्थिनी स्वयंसेवक सहभागी झाले होते.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a comment

0 Comments