मंगळवारपासून बारावी बोर्ड परीक्षा सुरू

मंगळवारपासून बारावी बोर्ड परीक्षा सुरू


मंगळवारपासून बारावी बोर्ड परीक्षा सुरू
                         श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयात तयारी पुर्ण; सर्व वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे 
माणदेश एक्सप्रेस न्यूज
आटपाडी/प्रतिनिधी :  मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी 2020 पासून ते 11 मार्च 2020 या कालावधीत इयत्ता 12 वी कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय,आटपाडी (केंद्र क्रमांक 0291) येथे होत आहेत. 
सदर परीक्षेसाठीची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. या केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची शारीरिक तपासणी करण्याकरिता व विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या गैरमार्गाचा अवलंब करू नये म्हणून वेगवेगळ्या दक्षता समितींची स्थापना केली आहे. तसेच परीक्षा कालावधीत चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  विद्यार्थ्यांनी बोर्डाकडून अधिकृतरीत्या प्रसिद्ध झालेल्या वेळापत्रकाचाच वापर करावा,  जाहिरातींसाठी  वेगवेगळ्या संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकावर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये. याबाबतच्या सूचना  केंद्र संचालक संताजी लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना केल्या आहेत.  या केंद्रावर गेली सात वर्षे कोणतेही गैरप्रकार आढळून आले नाहीत त्यामुळे हे केंद्र कोल्हापूर विभागातील सर्वोत्कृष्ट केंद्राच्या यादीत असून हा लौकिक विद्यार्थ्यांनी कायम ठेवण्याचे आवाहन केंद्र संचालक संताजी लोखंडे यांनी केले आहे.
 विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांचा अवलंब केल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे केंद्र संचालकांनी स्पष्ट केले. बारावीच्या सर्व परीक्षार्थींना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय लोंढे व केंद्र संचालक संताजी लोखंडे यांनी परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.


सदर परीक्षेसाठी ची बैठक व्यवस्था खालील प्रमाणे करण्यात आली आहे श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयात कला शाखेच्या X075947 पासून ते X076475 पर्यंत करण्यात आली आहे तर वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था  X109105 पासून ते X109153 पर्यंत करण्यात आली आहे तर उर्वरित वाणिज्य शाखेच्या   बैठक क्रमांक X109154 ते X109446 पर्यंतच्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था श्रीमती वत्सला देवी देसाई गर्ल्स हायस्कूल, आटपाडी याठिकाणी करण्यात आली आहे. सदर बैठक व्यवस्था हि फक्त इंग्रजी विषयाच्या पेपर साठीची असून या बैठक व्यवस्थेमध्ये प्रत्येक पेपरला बदल होईल याची नोंद विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी घ्यावी.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a comment

0 Comments