फसवणूक प्रकरणी म्हसवड पोलीसात तक्रार दाखल 

फसवणूक प्रकरणी म्हसवड पोलीसात तक्रार दाखल 


फसवणूक प्रकरणी म्हसवड पोलीसात तक्रार दाखल 
विनापरवाना जादा दराने व्याजाची आकारण ; दुकान गाळ्यांचे केले बनावट दस्त 
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/प्रतिनिधी : विनापरवाना जास्त व्याज घेऊन तसेच शारीरिक, मानसिक छळ करून व बनावट दस्तऐवज करून फसवणूक केल्याची तक्रार म्हसवड येथील चार जणांविरोधात म्हसवड पोलिसात करण्यात आली आहे. 
याबाबत म्हसवड पोलिसात सलाउद्दीन जमिरुद्दीन काझी वय ३५ रा. म्हसवड यांनी संजय रामचंद्र पानसांडे, सौ वैशाली संजय पानसांडे, अमोल साहेबराव राऊत व बाळासाहेब रामचंद्र पानसांडे सर्व रा.म्हसवड या चार जनांविरोधात फिर्याद दिली आहे. यामध्ये फिर्यादी याचेकडून विनापरवाना जादा दराने व्याज घेऊन तसेच फिर्यादीच्या पत्नीस शिवीगाळ, दमदाटी केली असल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे. तर बाळासाहेब पानसांडे याने फिर्यादीस लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या हातावर व पाठीत मारून शारीरिक व मानसिक छळ केल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे चेक बाऊन्सच्या खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या असून सि.स.नं. 396/4 मधील गाळा नं 1 व गाळा नं 2 या दोन्ही गाळ्यांचे खोटा बनावट खरेदी दस्त करून त्यास खोटी कागदपत्रे जोडून खोटी सही करून फसवणूक केली आहे. सदर घटनेचा अधिक अधिक तपास सपोनि गणेश वाघमोडे हे करीत आहेत. इतर कोणास खाजगी सावकार त्रास देत असतील तर त्यांनी म्हसवड पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन सपोनि गणेश वाघमोडे यांनी केले आहे.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a comment

0 Comments