माळशिरस येथील पुरातन स्मारके महादजी व सखुबाई निंबाळकरांच्या वंशजांनी त्याच्या समाध्या नसल्याचा दिला निर्वाळा  

माळशिरस येथील पुरातन स्मारके महादजी व सखुबाई निंबाळकरांच्या वंशजांनी त्याच्या समाध्या नसल्याचा दिला निर्वाळा  


माळशिरस येथील पुरातन स्मारके  महादजी व सखुबाई निंबाळकरांच्या वंशजांनी त्याच्या समाध्या नसल्याचा दिला निर्वाळा


 माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : काही दिवसांपासून डागडुजीचे काम सुरू असलेल्या माळशिरस शहरालगतच्या वास्तु बाबत नवे इतिहास संशोधन पुढे येऊ लागली आहेत. त्यामुळे ऐतिहासिक मतमतांतरे चर्चेला येऊ लागली आहेत. ही समाधी छत्रपती शिवाजी महाराजांचे जावई व मुलगी यांची असल्याचा उल्लेख समोर आला होता मात्र महादजी व सखुबाई निंबाळकर यांच्या समाध्या वेगळ्या ठिकाणी असल्यामुळे या समाध्या त्यांच्या नसल्याचा निर्वाळा त्यांच्या वंशजांनी दिला. यामुळे अनेक इतिहास संशोधकांची कसोटी लागणार असून या बाबत माळशिरस गावचे सरंजाम असणाऱ्या वाघमोडे सरदारांच्या समाधीचा संदर्भ लावला जात आहे. त्यामुळे या वास्तूचे गूड दिवसेंदिवस वाढू लागले आहे. यासाठी लवकरच इतिहास संशोधकांची टीम शहरातील या पुरातन वास्तूला भेट देणार आहे.
सोलापूर जिल्ह्याचा इतिहास या पुस्तकांमध्ये इतिहास संशोधक गोपाळराव देशमुख यांनी या समाधी बाबतचे संशोधन लिहिताना ही समाधी अकलूज किल्ल्यावरून लढाई करून परतत असताना शिवाजी महाराजांचे थोरले जावई महादजी निंबाळकर व सखुबाई निंबाळकर यांची असल्याचा उल्लेख केला होता. अनेक वर्ष हाच इतिहास पुढे येत राहिला. मात्र याबाबत निंबाळकरांचे वंशजांचे व इतिहास संशोधक डॉ.सुवर्णा निंबाळकर यांनी महादजी निंबाळकर यांचा मृत्यू  ग्वाल्हेर येथे झालेला असून त्यांची समाधी तेथे आहे तर सखुबाई निंबाळकर यांची समाधी फलटणमध्ये असल्याची माहिती दिली. त्यामुळे या समाधी बाबत संभ्रम निर्माण झालेला असून या परिसरातील इतर अभ्यासकांचे मते ही समाधी विर  पुरुषाची असून यामध्ये या गावचे सरंजाम असणाऱ्या सरदारांची असण्याची शक्यता आहे. कारण महाराणी ताराबाई यांनी वाघमोडे सरदारांना माळशिरस, भांबुर्डी, पुरंदावडे, फोंडशिरस अशा गावांचा सरंजाम व जहागिरी दिलेली होती.  इतर वाघमोडे सरदारांच्या समाध्या आसपासच्या गावात आज ही अस्तित्वात असून त्या समाज यांचे बांधकाम घुमटाकृती आहे याशिवाय ती समाधी असलेली जमीन वाघमोडे-पाटील यांच्या मालकीची आसल्याचा दावा केला जात असुन. त्यामुळे या समाधी बाबतचे संशोधन सुरू आहे. मात्र नेमके या समाधीचे गुढ काय असावे याची आतूरता सर्वसामान्यांना लागून राहिली आहे.मावळ्यांची कर्तबगारी ठरली मोलाची
ही स्मारके गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होती. याबाबत अनेक तर्कवितर्क सुरू होते मात्र ही वास्तू पुरातन असून जतन होणे आवश्यक असल्याच्या भावनेने  परिसरातील तरुण मावळ्यांनी ही वस्तू जतन करण्यासाठी धाडसाने पाऊल उचलले व ढासळलेला चौथरा, तुळशी वृंदावन, आदिंची डागडुजी करीत परिसरही स्वच्छ करण्यात आला. या कामाला सुरुवात होताच परिसरातील अनेकांनी मदत पुढे केली त्यामुळे सध्या वास्तूचे काम डागडुजी सुरू आहे या वास्तूचा इतिहास नक्कीच प्रेरणादायी ठरणार मात्र यामध्ये जीर्णोद्धारासाठी पाऊल उचलणाऱ्या मावळ्यांची कर्तबगारी लाख मोलाची ठरली आहे.
महाराणी ताराराणीनी यांनी माळशिरस हे गाव वाघमोडे सरदारांना सरंजामात दिल्याच्या नोंदी आहेत. ओढया काठी असलेली समाधी विरपुरुषाची आसावी. समाधीची जागा व परिसरातील काही समाध्या व इतिहासाच्या आधारे या गावचा सरंजाम असणाऱ्या सरदारांची असावी. मात्र  यासबंधी भविष्यात हि कोणी अधिक संशोधन करुन नवे संदर्भ दिल्यास या समाधीचे गूढ उकलण्यासाठी उपयोग होणार आसुन ते सर्वानुमते स्वीकारले जाईल.
सुमित लोखंडे (सचिव- मरहट्टी संशोधन आणि विकास मंडळ, पुणे)
महादजी निंबाळकर व सखुबाई निंबाळकर यांचा इतिहास वेगळ्या स्वरूपाचा आहे. महादजी निंबाळकर यांचा मृत्यू ग्वाल्हेर मध्ये झालेला असून तेथे त्यांची समाधी आहे. तर सखुबाई निंबाळकर यांची समाधी फलटणमध्ये आहे. माळशिरस मध्ये असणाऱ्या समाध्यांना वेगळा इतिहास आसावा  . मात्र त्याचा सबंध महादजी व सखुबाई यांच्या समाधीशी जोडणे चुकीचे होईल.
डॉ सुवर्णा निंबाळकर , इतिहास संशोधक पुणे


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a Comment

0 Comments