अजनाळेत फायनान्स कंपन्याकडून महिलांची आर्थिक पिळवणूक कर्जाचा हप्ता वेळेवर जात नसल्यामुळे गाव सोडून जाण्याची आली वेळ

अजनाळेत फायनान्स कंपन्याकडून महिलांची आर्थिक पिळवणूक कर्जाचा हप्ता वेळेवर जात नसल्यामुळे गाव सोडून जाण्याची आली वेळ


अजनाळेत फायनान्स कंपन्याकडून महिलांची आर्थिक पिळवणूक
कर्जाचा हप्ता वेळेवर जात नसल्यामुळे गाव सोडून जाण्याची आली वेळ
माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/सचिन धांडोरे : डाळिंब उत्पादनाच्या बाबतीमध्ये अग्रेसर असलेल्या अजनाळे ता. सांगोला येथे फायनान्स कंपन्याकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत आहे. वेगवेगळ्या फायनान्स कंपन्याकडून कडून महिलांना कर्ज पुरवठा केला जातो मात्र तो कर्जपुरवठा करताना अव्वाच्या सव्वा दराने व्याज लावून महिलांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक केली जात असल्याची धक्कादायक बाबा आता समोर आली आहे. या फायनान्स कंपनीचे जाळे सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात पसरले आहे. गोरगरीब महिलांच्या अडचणी पाहून हे फायनान्स कंपनी वाले दहा महिलांचा ग्रुप करून महिलांना आर्थिक कर्ज पुरवठा केला जातो. फायनान्स कंपनी कडून चालले जाणारे बचत गट हे कायदेशीर आहेत का? याची व्याजदर आकारणे कोणत्या निकषावर केली जाते याची उलटसुलट चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. या फायनान्स चे कर्ज न फेडता आल्यामुळे  अनेक कुटुंब गाव सोडून गेले आहेत त्यामुळे तर काहीजण आणखी गाव सोडून जाण्याच्या मार्गावर आहेत.
या फायनान्स बचत गटाचा हप्ता दर महिन्याला फायनान्सचे अधिकारी गावात सकाळी  सात वाजता येऊन पैसे वसूल करून जातात जर एखाद्या महिलेने हप्ता न भरल्यास गटांमधील सर्व महिला एकत्र मिळून संबंधित महिलेकडे पैसे मागण्यासाठी जातात व पैसे न दिल्यास बचत गटाचे साहेब घराला कुलूप लावण्याची धमकी दिली जाते. हातावर पोट असणाऱ्या व रोजगार करणाऱ्या महिला या बचत गटाच्या जाळ्यात अडकल्या आहेत. अजनाळे गावांमध्ये आठ ते दहा फायनान्स कंपनीने गावाला अक्षरशः वेडा आणला आहे. या फायनान्सच्या कर्जाला येथील महिला वैतागून गेल्या आहेत. फायनान्स कंपनी कडून होणारी महिलांची आर्थिक पिळवणूक कधी थांबणार?  व महिला फायनान्स कंपन्याकडून कधी मुक्त होणार? अशी चर्चा महिलावर्ग मधून चालू आहे. प्रशासनाने हे फायनान्स कंपनी वाले कायदेशीर आहेत का? याची तपासणी करून फायनान्स कंपनीच्या जाळ्यात अडकलेल्या महिलांना मुक्त करावे अशी मागणी हळूहळू जोर धरू लागली आहे.

घरची परिस्थिती अत्यंत गरीब असल्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी वेगवेगळ्या फायनान्स कडून  लाखो रुपये कर्ज घेतले होते. मात्र त्या कर्जाची वेळेवर परतफेड न केल्यामुळे अजनाळे गावातील  एका कुटुंबावर  गाव सोडून दुसऱ्या गावात जाऊन राहण्याची वेळ आली आहे.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a comment

0 Comments