शिवजंयती निमित्त स्वेरीत रक्तदान शिबीर संपन्न  ; स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा स्तुत्य उपक्रम

शिवजंयती निमित्त स्वेरीत रक्तदान शिबीर संपन्न  ; स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा स्तुत्य उपक्रम


माणदेश एक्सप्रेस न्युज
पंढरपूर : गोपाळपुर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित इंजिनीअरिंग व फार्मसी अंतर्गत असलेल्या व सोलापूर विद्यापीठ संलग्नित असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९० व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजिलेल्या रक्तदान शिबीरात अभियांत्रिकी पदवीच्या २०० विद्यार्थी तर अभियांत्रिकी पदविकेच्या ७५ विद्यार्थी असे मिळून स्वेरीतील एकूण २७५ विद्यार्थी, विद्यार्थींनी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी  ऐच्छीक रक्तदान केले.
‘शिवजयंती’ म्हणजे तरुणांच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. सर्वजण शिवजयंती साजरी करताना अनेक विधायक उपक्रम राबवितात. यामध्ये स्वेरी देखील मागे नाही. स्वेरी अंतर्गत असलेल्या पदवी अभियांत्रिकी व पदविका अभियांत्रिकीच्या राष्ट्रीय सेवा योजनेअतर्गंत ऐच्छीक रक्तदान शिबीर राबविण्यात आले. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकीचे रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी डॉ.आर.एन. हरिदास व प्रा. महेश मठपती तर डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्रा. सुनील भिंगारे यांच्या नेतृत्वाखाली शिवजंयतीच्या निमित्ताने रक्तदान शिबीर राबविले. स्वेरी अंतर्गत असणाऱ्या पदवी अभियांत्रिकीच्या २०० व पदविका अभियांत्रिकीच्या ७५ विद्यार्थ्यांनी अशा एकूण २७५ विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. यावेळी पंढरपूर ब्लड बँक व सोलापूर ब्लड बँक या रक्तपेढयांना पाचारण करण्यात आले होते. रक्तदान केल्यानंतर रक्तदात्यांच्या आरोग्याची काळजी रक्तपेढीतील वैद्यकीय अधिकारी प्रसाद खाडीलकर व उत्तम गायकवाड व त्यांचे कर्मचारी वर्ग घेत होते. रक्तदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी स्वेरीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी परिश्रम घेतले. रक्तदानाच्या ठिकाणी शिवजयंतीचे पाहुणे महाराष्ट्राच्या सहकार परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जाचे) ना. शेखर चरेगांवकर,संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, विश्वस्त बी.डी.रोंगे, विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.करण पाटील, फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल, डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी देखील भेट देवून पाहणी केली.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a Comment

0 Comments