एस टी बस चालू करा 

एस टी बस चालू करा 


एस टी बस चालू करा 
..अन्यथा रस्तारोकोचा वडजल सरपंच यांचा इशारा 
म्हसवड/अहमद मुल्ला : गत पंधरा वर्षापासून वडजल येथे मुक्कामी  असलेली वडूज आगाराची एस.टी.पुर्ववत सुरू करावी अन्यथा १७ रोजी वडजल येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सरपंच मनिषा मोहन वाघमारे यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.
वडुज आगार प्रमूख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, गत पंधरा वर्षापासून वडजल येथे वडूज आगाराची एस टी मुक्कामी येत होती. मात्र ती बंद करून सध्या आटपाडी येथील झरे या गावी सोडण्यात आली आहे. सदर एसटी बस वडजल मुक्कामी बंद झाल्याने मायणीहून येणाऱ्या प्रवाशांचे तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थ्यांनींचे हाल होत असून कॉलेज वरून घरी येण्यासाठी रात्र होत असून पालक वर्ग चिंतेत आहे. उशीरा येण्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
मागणीचे निवेदन वडूज आगार प्रमूख यांना चंद्रसेन काटकर, गोविंदपंच काटकर व ग्रामस्थांनी दिले असून या निवेदनाची अद्याप पर्यंत दखल घेतली नसल्याने सोमवारी सकाळी 10 वाजता म्हसवड-मायणी रस्त्यावर वडजल एस.टी. स्टॅन्ड वर विविध गावचे ग्रामस्थ, पालकवर्ग, विद्यार्थी रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


 


Post a comment

0 Comments