ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात इतिहास घडवा ; राजाराम देशमुख ; जांभूळणीत शिवजयंती साजरी ; जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न 


ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात इतिहास घडवा
राजाराम देशमुख ; जांभूळणीत शिवजयंती साजरी ; जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात इतिहास घडवा असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजाराम देशमुख यांनी व्यक्त केले. ते जांभूळणी येथील शिवजयंती कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजाराम देशमुख व आटपाडीच्या सरपंच सौ.वृषाली धनंजय पाटील  जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, आटपाडी पंचायत समिती सभापती सौ. डॉ. भुमिका बेरगळ यांच्या हस्ते लहान व खुल्या गटातील वक्तृत्व तसेच बुद्धीबळ स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, आजच्या युवक व युवतींनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरापगड जाती व बारा बलुतेदारांना, मुठभर मावळयांना हाताशी धरून बुद्धी व मनगटाच्या बळावर निधड्या छातीने घडवलेल्या दैदिप्यमान इतिहासातून आदर्श घेऊन इतिहासात रमून न जाता तुम्ही ज्या क्षेत्रात वावरताय त्या क्षेत्रात इतिहास घडविला पाहिजे. आजचे नवयुवक छत्रपती शिवाजी महाराजांना जसे डोक्यावर घेऊन नाचतात तसेच आजच्या या नवयुवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान आदर्शवत इतिहास डोक्यात देखिल घेतला पाहिजे व सामाजिक जीवनात वावरत असतेवेळी त्याचे अनुकरण देखिल केले पाहिजे. या शिवजयंती उत्सवाला जांभूळणी व आजूबाजूच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राजमुद्रा युवा प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची छत्रपती शिवरायांच्या जयघोषात गावातून भव्य आशी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत जांभूळणी गावातील अनेक लहान मुले छत्रपती शिवरायांच्या बाल शिवाजी या वेशभूषेत सहभागी झाले होते.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured