श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संकुलामध्ये पदवी वितरण समारंभ : प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील

श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संकुलामध्ये पदवी वितरण समारंभ : प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील


श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संकुलामध्ये पदवी वितरण समारंभ :
प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील
माणदेश एक्स्प्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, आटपाडी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, व श्री.तानाजीराव पाटील षिक्षणशास्त्र (बी.एड, एम.एड) महाविद्यालय, आटपाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठाचा 56 वा व महाविद्यालयाचा दुसरा पदवीदान वितरण समारंभ श्रीराम बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, सांस्कृतिक हॉल, येथे बुधवार दि.26 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 09.30 वा संपन्न होणार आहे. 
दीक्षांत समारंभ किवा पदवीदान समारंभ हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक अतिशय महत्वाचा आणि आंनदाचा भाग असतो. त्यांच्या आयुष्यातील हा आंनदाचा क्षण कोणत्याही विद्यापीठाच्या किवा महाविद्यालयाचा प्रत्यक्ष शैक्षणिक वर्षातील हा महत्वाचा समारंभ असतो. 56 व्या दीक्षांत समारंभामध्ये प्रत्यक्ष पदवी प्राप्त करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी  महाराष्ट्र शासनाच्या नवीन नियमानुसार पदवी वितरण प्रक्रियेमध्ये गेल्या वर्षापासून बदल केलेला आहे. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी स्विकारण्याचा विकल्प केलेला होता. त्यांना संबंधित महाविद्यालयातून पदवी देण्याची व्यवस्था शिवाजी विद्यापीठाने केलेली आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या सर्व संलग्नित महाविद्यालयांत दीक्षांत समारंभासाठी अर्ज केलेल्या स्नातकांची पदवी प्रमाणपत्रे शिवाजी विद्यापीठाच्या वितरण व्यवस्थेतून महाविद्यालयाकडे देण्यात आलेली आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या धोरणानुसार श्रीराम बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेत कला व विज्ञान महाविद्यालय व श्री.तानाजीराव पाटील शिक्षणशास्त्र (बी.एड, एम.एड) महाविद्यालय,  यांचा पदवी वितरण कार्यक्रम आयोजित केलेला आहे अशी माहिती श्रीराम बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.तानाजीराव पाटील व प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांनी दिलेली आहे.
या समारंभासाठी प्रमुखे अतिथी व मार्गदर्शक म्हणून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर सिनेट सदस्य, मा. डॉ. मनोज गुजर व प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. श्रीनाथ पाटील उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाने चांगली तयारी केली असून महाविद्यालयामध्ये  विविध कमिटीची स्थापना करून भव्य मिरविणूकीने या कार्यक्रमांची सुरूवात होणार असून मागील वर्षात पदवी प्राप्त व ज्यांनी शिवाजी विद्यापीठाकडे  अर्ज केलेल्या स्नातकांनी पदवी प्रमाणपत्रे स्विकारण्यासाठी तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी यांनी व माझी विद्यार्थी या समारंभास  स.09.30 वा संस्थेच्या सांस्कृतिक हॉलमध्ये उपस्थित रहावे असे आवाहन कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी केले आहे.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a Comment

0 Comments