दहावीचा सदिच्छा समारंभ संपन्न

दहावीचा सदिच्छा समारंभ संपन्न

                        दहावीचा सदिच्छा संपन्न
माणदेश एक्स्प्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडीतील इझी क्लास मध्ये इ. दहावीचा सदिच्छा समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी श्री हजारे,  श्री चव्हाण,  श्री माळी उपस्थित होते. यानिमित्त क्लासमध्ये विविध उपक्रम घेण्यात आले. खो-खो,  क्रिकेट,  कबड्डी, स्लो सायकल, रनिंग इत्यादी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात भाषण केले. व क्लासमधील आपल्या आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. दहावीतील विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश देण्यात आला. राहिलेल्या कमी वेळात अभ्यासाचे नीटनेटके नियोजन करून जास्तीत जास्त मार्क कसे मिळवावे त्याचे मार्गदर्शन करण्यात आले. इयत्ता दहावीचे वर्ष हे जीवनाला कलाटणी देणारी असते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी जागृत होऊन अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे त्याचबरोबर तब्येत सांभाळून अभ्यासाचे नियोजन तितकेच महत्त्वाचे असते. विद्यार्थ्यांनी आता तन-मन-धन एकटवून अभ्यास करावा असे आव्हान करण्यात आले. 
याप्रसंगी अक्षदा पवार, श्रुती मरगळे, मानसी पाटील, चैत्राली कुलकर्णी, ओंकार केंगार यांनी आपली मनोगते व्यक्त केली, इझी क्लास नेहमीच अभ्यासाबरोबरच नवोपक्रम घेण्यात अग्रेसर आहे. अभ्यासाबरोबरच मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यात यावा यासाठी इझी क्लासेस नेहमी अग्रेसर असते. यावर्षी दहावीची उन्हाळी बॅच 10 एप्रिल पासून सुरू होणार असल्याची माहिती संचालकांनी दिली. इयत्ता दहावी बरोबरच पाचवी स्कॉलरशिप, नवोदय, सैनिकी स्कूल, इयत्ता आठवी स्कॉलरशिप, एन.एम.एम.एस. या सर्व स्पर्धा परीक्षांचे क्लास सुरू करणार होणार आहे. यावेळी इयत्ता पाचवी ते दहावी मधील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. 


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a comment

0 Comments