सांगली जिल्ह्यात संचारबंदी कालावधीत 1655 जणांवर कारवाई

सांगली जिल्ह्यात संचारबंदी कालावधीत 1655 जणांवर कारवाई


सांगली जिल्ह्यात संचारबंदी कालावधीत 1655 जणांवर कारवाई


माणदेश एक्सप्रेस न्युज


सांगली : कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव टाळण्यासाठी वारंवार गर्दी टाळा, घराबाहेर पडू नका असे अवाहन करण्यात येत आहे. यासाठी आनेक तातडीच्या उपायायोजनाही काटेकोरपणे राबविण्यात येत आहेत. दिनांक 22 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जतना कफ्यूर् चे  आवाहन केले होते याला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. तथापि, काही लोक अनावश्यक घराबाहेर पडून स्वत:चे आपल्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आणत आहेत. याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन कडक भूमिका घेत आहे. 
दिनांक 22 मार्च रोजी रात्री 9 ते 24 मार्चच्या सायंकाळी 6 पर्यंत एकूण 1655 जणांवर कारवाई करण्यात आली  आहे. त्यामध्ये भादविस कलम 188 अन्वये 24 जणांवर व मोटार वाहन केसेस 1631  कारवाई करण्यात आली असून एकूण 4 लाख 22 हजार इतका दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे.Join :- whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


 


Post a comment

0 Comments