'जनता कर्फ्यु' च्या पार्श्वभूमीवर निंबवडेत पोलिस पाटलांची सतर्क गस्त 

'जनता कर्फ्यु' च्या पार्श्वभूमीवर निंबवडेत पोलिस पाटलांची सतर्क गस्त 

 


जनता कर्फ्यु च्या पार्श्वभूमीवर निंबवडेत पोलिस पाटलांची सतर्क गस्त 
माणदेश एक्सप्रेस न्युज
निंबवडे/राघव मेटकरी : आज दि २२ रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासियांना जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते हा बंद संपुर्ण देशासोबत पाळताना निंबवडे गावात सुद्धा चोख पाळण्यात आला. 
सकाळपासून निंबवडे गावचे पोलिस पाटील रस्त्यावर उतरून लोकांना सूचना देऊन घरात बसायला सांगताना दिसत होते. अलीकडच्या दोन दिवसात पुणे, मुंबई शहरातून लोकांचे लोंढे गावात आले असून त्यामुळे सरमिसळ वातावरण तयार झाले असल्याने लोकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचे त्यांनी लोकांना समजून सांगितले. सायंकाळी पाच नंतर काही अतिउत्साही शहरी मुलांनी गावात फिरण्याचा प्रयत्न केल्यावर पोलीस पाटील प्रविण मंडले यांनी त्याना घरी बसण्याच्या सूचना केल्या. यावेळी सरपंच, उपसरपंच यांनी वेळोवेळी आढावा घेत पुढील कर्फ्युच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी वेगळे आणि सुरक्षित राहण्याची विनंती केली आहे.  मुंबई आणि पुणे या शहरातून अनेक गावकरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात आले आहेत. त्यांनी स्वतःहून बाहेर पडू नये घरात सुरक्षित राहावे. अनावश्यक बाहेर पडत असलेल्या लोकांमुळे गावात संशयाचे वातावरण निर्माण होतात दिसत असून लोकांमध्ये असुरक्षितेची भावना वाढू नये यासाठी सर्वच शहरातून आलेल्या लोकांना मी आवाहन करतो की त्यांनी स्वतः सोबत सर्वांची काळजी घ्यावी. अन्यथा पोलिस यंत्रणेला याबाबत कळवण्यात येऊन कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखली जाईल.
प्रविण मडले  
पोलिस पाटील, निंबवडे


दैनिक माणदेश एक्सप्रेस whatasapp वर Free मिळविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा


Post a comment

0 Comments