रामकृष्ण गोडसे याचे गणित प्रज्ञा स्पर्धा परीक्षेत राज्यस्तरीय उज्वल यश

रामकृष्ण गोडसे याचे गणित प्रज्ञा स्पर्धा परीक्षेत राज्यस्तरीय उज्वल यश


रामकृष्ण गोडसे याचे गणित प्रज्ञा स्पर्धा परीक्षेत राज्यस्तरीय उज्वल यश


माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ यांचे वतीने राज्यभरात घेण्यात येणाऱ्या गणित प्रज्ञा स्पर्धा परीक्षा २०२० (इ.५ वी)चा निकाल नुकताच जाहीर झाला. पाचवी व आठवी साठी ही परीक्षा घेण्यात येते.राज्यभरातून इयत्ता पाचवीसाठी जवळजवळ सात हजार विद्यार्थी या परीक्षेस बसलेले होते. यामध्ये सांगली जिल्ह्यातून इ.५ वी चे फक्त सहा विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गळवेवाडी या शाळेचा विद्यार्थी रामकृष्ण यशवंत गोडसे (इ.५ वी)याने या गणित प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षेत राज्यात राज्य मेरिट यादीत येण्याचा बहुमान मिळवला आहे. महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्यावतीने त्याला प्रशस्तीपत्रक शील्ड व बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातून या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जे ६ विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यामध्ये आटपाडी तालुक्यातील गळवेवाडी शाळेचा हा  एकमेव विद्यार्थी आहे. त्याच्या या उज्वल यशाबद्दलशाळेचे मुख्याध्यापक सौ. रंजना सूर्यवंशी, शिक्षक हैबतराव पावणे, सत्यवान मोटे, जगदीश खाडे, गोरख मैड, अक्षय थोरात, यशवंत गोडसे,केंद्रप्रमुख अर्जुन विभुते, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ यांच्याकडून त्याचे अभिनंदन करण्यात आले.सावंत गुरुकुल अकॅडमी पलूस चे व्यवस्थापक श्री.शंकर सावंत सर व वर्गशिक्षक मुकेश क्षीरसागर सर यांचे त्याला मार्गदर्शन मिळाले.


 


दैनिक माणदेश एक्सप्रेस whatasapp वर Free मिळविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a comment

0 Comments