Type Here to Get Search Results !

विभूतवाडीचे सरपंच चंद्रकात पावणे यांचे एक महिन्याचे ४००० रुपये मानधन मुख्यमंत्री सहाय्य निधीस ; तालुक्यातील तसेच राज्यातील इतर सरपंच यांनी आदर्श घेण्याचे केले आवाहन


विभूतवाडीचे सरपंच चंद्रकात पावणे यांचे एक महिन्याचे ४००० रुपये मानधन मुख्यमंत्री सहाय्य निधीस 
तालुक्यातील तसेच राज्यातील इतर सरपंच यांनी आदर्श घेण्याचे केले आवाहन
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : आटपाडी तालुक्यातील विभुतवाडीचे लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत राजाराम पावणे यांनी आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधिस देऊन अनमोल हातभार लावल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी आपल्या या कार्याने समाजाच्या समोर एक आदर्श निर्माण केला आहे. 
कोरोनाच्या आपत्तीमुळे निर्माण झालेल्या भयानक आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी विभुतवाडीचे लोकनियुक्त सरपंच, चंद्रकांत राजाराम पावणे यांनी आपले एक महिन्याचे 4000 रू.मानधन  मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केले आहे. पाठीमागील काही दिवसापासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये कोरोनाच्या विषाणूनी थैमान घातले आहे. कोरोना हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे देशातील व राज्यातील सर्व जनतेचे आर्थिक व्यवहार, काम-धंदे, उद्योग, शेती व शिक्षण ठप्प झालेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला व सरकारला अनंत आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.  सरकारलाही सर्वसामान्य जनतेच्या विविध समस्या सोडवण्यासाठी व औषध उपचार करण्यासाठी आर्थिक मदतीची अत्यंत गरज असते, याची जाणीव ठेवून व आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान राखून चंद्रकांत पावणे यांनी आपला एक महिन्याचा पगार महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केला आहे. हा आदर्श देशातील व राज्यातील इतर सर्व जबाबदार व आर्थिक दृष्टीने संपन्न असलेल्या नागरिकांनी समोर ठेवून, निर्माण झालेल्या आपत्तीत सरकारला व देशातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेला आर्थिक हातभार लावून मदत केली, तर निश्चितपणे कोरोना सारख्या भयानक आजारापासून आपण आपल्या देशातील व राज्यातील जनतेला मुक्त करू शकतो.  हा संदेश चंद्रकांत पावणे यांनी आपल्या कार्यातून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांचा आदर्श आटपाडी तालुक्यातील तसेच राज्यातील एकूण २८००३ सरपंच यांनी जर हा निर्णय घेतला तर मुख्यमंत्री सहाय्य निधीस ११२ कोटी १२ हजार रुपयांची मदत होवून नक्कीच मोठा हातभार लागणार आहे.


Join :- whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies