कोरोनाची टेस्टिंग लॅब मिरजेत लवकरच सुरू होणार ;  आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर ; मिरज येथील शासकीय रुग्णालयास आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली भेट

कोरोनाची टेस्टिंग लॅब मिरजेत लवकरच सुरू होणार ;  आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर ; मिरज येथील शासकीय रुग्णालयास आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली भेट


कोरोनाची टेस्टिंग लॅब मिरजेत लवकरच सुरू होणार ;  आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर ; मिरज येथील शासकीय रुग्णालयास आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली भेट
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मिरज येथे लवकरच कोरोना तपासणी लॅब सुरू करण्याची घोषणा शासनाने केली होती. मिरज येथील शासकीय रुग्णालय परिसरात सुरू होत असलेल्या कोरोना लॅबच्या कामाची माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी प्रत्यक्ष जाऊन घेतली. लॅब सुरू करण्यासाठी आवश्यक ती सर्व साधनसामुग्री दाखल झाली आहे. लॅबच्या कामाची प्रगती पाहून सदरची लॅब लवकरच सुरु करत असल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. ही लॅब सुरू झाल्यामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या परिसरातील संशयित रुग्णांच्या सॅम्पल्स तपासणीला गती मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, सध्या या संपूर्ण परिसरातील संशयितांचे सॅम्पल्स पुण्याला पाठवावे लागतात. त्याचे रिपोर्ट यायला किमान दोन दिवस लागतात. त्यामुळे संशयित रुग्णांना विनाकारण ॲडमिट करून घ्यावे लागते. ही लॅब सुरू झाल्यामुळे संशयित दाखल रुग्णांची तातडीने तपासणी होऊन त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर त्यांना सोडून देता येणार आहे. मिरज शासकीय रुग्णालयात सध्या कोरोना बाधीत चोवीस रुग्णांवर आयसोलेशन विभागात उपचार मिळत आहेत याचाही आढावा राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी घेतला, या विभागात काम करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स आणि सर्व कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. मिरज शासकीय रुग्णालयात 140 बाधित रुग्णांची उपचारासाठीची सोय होण्याची व्यवस्था रुग्णालयाने केली आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या टप्प्यात आपण असून येणारा तिसरा टप्पा अतिशय महत्त्वाचा असल्याने सर्वांनी काळजी घ्यावी. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी एकजुटीने यापुढच्या काळात या संकटाला सामोरे जावे असेही आवाहन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी उपस्थित डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले.
यावेळी आरोग्य संचालक हेमंतकुमार बोरसे, मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, डॉ. पल्लवी साबळे यांच्यासह डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Join :- whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments