विट्ठलापूर येथे  डमडम लावण्याच्या कारणावरून भांडणे 

विट्ठलापूर येथे  डमडम लावण्याच्या कारणावरून भांडणे 


विट्ठलापूर येथे  डमडम लावण्याच्या कारणावरून भांडणे 


माणदेश.एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील विठ्ठलापूर येथील नागरिकांना झाले तरी काय हा प्रश्न सध्या आटपाडी तालुक्यातील नागरिकांना सतावत आहे. देशात व राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण लॉकडाऊन असताना डमडम लावण्याच्या कारणावरून बाड व जावीर दोन्ही गटात मारामारी व परस्पर फिर्यादी आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या असून विठ्ठलापूरकारांना कोरोनाचे गांभीर्य तरी समजले का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विट्ठलापूर येथील संगीता उत्तम जावीर  व सुवर्णा दत्ता बाड यांची घरे आहेत. फिर्यादी  संगीता उत्तम जावीर  यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बापू दामू बाड, पांडुरंग बाड, इंदुबाई दादासो बाड, दादासो बाड, सुमन बापू बाड, सुवर्णा दत्ता बाड, दिगंबर बाड, विठ्ठल बाड या सर्वांनी जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू असताना आमच्या घरासमोर लावलेले डमडम काढ, म्हणून फिर्यादीची मुले दिपक, महादेव, संतोष यांना प्लॅस्टिकच्या पाण्याच्या पाईपने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे.
तर सुवर्णा दत्ता बाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उत्तम अण्णा जावीर, विशाल जावीर, काजल जावीर, संगीता जावीर, दीपक जावीर, महादेव जावीर यांनी घरासमोर लावलेली डमडम काढणार नाही म्हणून शिवीगाळ व मारहाण केली. तसेच डोळ्यांमध्ये चटणी टाकून हातातील लाकडी फळीने रेशमा पांडुरंग बाड, हीच्या डोक्यावर व दिगंबर याच्या डोक्यात व हातावर, कमरेच्या पट्ट्याने व सळईने  मारहाण केली, म्हणून फिर्याद दिली आहे. सदरची घटना ही दिनांक 27 रोजी विठ्ठलापूर येथील फिर्यादी व आरोपींच्या राहते घरासमोर घडली आहे. याबाबत आटपाडी पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोफौ चोरमुले व भोते करीत आहेत.
देशावर कोरोनाचे मोठे गंभीर संकट असताना देखील अजूनही गावागावातील लोकांची किरकोळ कारणांमुळे होणारी भांडणे थांबताना दिसत नाहीत. ही बाब चिंताजनक आहे.


Join :- whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments