खरसुंडीचे सिद्धनाथ मंदिर देवदर्शनासाठी बंद ; कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देवस्थान ट्रस्टची खबरदारी 

खरसुंडीचे सिद्धनाथ मंदिर देवदर्शनासाठी बंद ; कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देवस्थान ट्रस्टची खबरदारी 


खरसुंडीचे सिद्धनाथ मंदिर देवदर्शनासाठी बंद
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देवस्थान ट्रस्टची खबरदारी 
माणदेश एक्सप्रेस न्युज
मनोज कांबळे / खरसुंडी : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले खरसुंडी (ता.आटपाडी) येथील श्री सिद्धनाथ मंदिर ३१ मार्च २०२० पर्यंत देवदर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मंगळवार दि.१७ मार्चपासून मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी म्हणून मंदिर बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. या आदेशानुसारच श्रीनाथ देव देवस्थान कडून मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. 
खरसुंडी येथे सिद्धनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची दररोज गर्दी असते. सण-उत्सव, रविवार तसेच पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. सध्याची परिस्थिती पाहता कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासकीय आदेशानुसार मंदिर बंद ठेवण्यात आले आहे.  मात्र मंदिरातील देवपूजा, धुपारती-शेजारती पुजारी यांचेमार्फत नियमित होत आहे. एरवी "नाथबाबाच्या नावानं चांगभलं" ने घुमणारी नाथनगरी शांत आहे.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मंदिर ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. सर्व भाविकांनी नोंद घ्यावी व देवस्थान ट्रस्टला सहकार्य करावे.


चंद्रकांत दौलता पुजारी
चेअरमन
श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्ट खरसुंडी.
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशात प्रसिद्ध असलेल्या चैत्री सासनकाठी सोहळ्यावर कोरोना विषाणूचे सावट आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या सासनकाठी सोहळ्यावर याचा परिणाम होणार का ? याबाबत भाविकांमध्ये तर्क-वितर्क सुरू आहेत.


दैनिक माणदेश एक्सप्रेस whatasapp वर Free मिळविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


 


Post a comment

0 Comments