कल्लेश्वर मंदिरातील हरिपाठ झाला बंद  ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भजनी मंडळाचा निर्णय ; चार वर्षाची सेवा खंडित 

कल्लेश्वर मंदिरातील हरिपाठ झाला बंद  ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भजनी मंडळाचा निर्णय ; चार वर्षाची सेवा खंडित 


कल्लेश्वर मंदिरातील हरिपाठ झाला बंद 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भजनी मंडळाचा निर्णय ; चार वर्षाची सेवा खंडित 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : आटपाडी येथील भल्या पहाटे हरिपाठाचा वाजणारा टाळ, मृदंगाचा आवाज ‘कोरोना; च्या पार्श्वभूमीवर बंद झाला आहे. ‘कोरोना’ या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंध उपाय म्हणून गर्दी न करणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचे पालनही केले जात आहे. गेल्या चार वर्षापासून भल्यापहाटे कलेश्वर मंदिर येथे हरिपाठाचा जागर होत असून परिसरातील सर्व मंडळी एकत्र येत टाळमृदुंगाच्या गजरात तल्लीन होऊन देहभान हरपून नामस्मरण, भजन, कीर्तन सादर करून तल्लीन होऊन जात.
आजच्या भावी पिढीला अध्यात्मिक ज्ञान मिळण्याच्या हेतूने व्यवसायिक, नोकरदार, रिटायर तर कोण टेलर आपापले काम सांभाळून सहभागी होऊन एकत्र येत हरिपाठाचा जागर होत असे. भक्तिमय वातावरणात हरिपाठाची चार वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. सध्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर परंपरा खंडित झाला आहे.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments