राज्यात संचारबंदी लागू ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून घोषणा ; जिल्ह्याच्या सीमा बंद ; अत्यावश्यक सेवा सुरु ; संचारबंदी मौजमजेसाठी नाही तर. स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी

माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी आजपासुन महाराष्ट्रात संचारबंदी लागु करण्यात आली असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली.  या संचारबंदीमुळे राज्यातील सर्व जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. टॅक्सी, रिक्षा अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. जमावबंदीच्या आदेशानांतर आज मुख्यामंत्र्यांनी अधिकची खबरदारी घेत संचारबंदीही लागू केली. 
महाराष्ट्रातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ७५ वरुन ८९ वर गेल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात संचारबंदी लागू केली. याचबरोबर राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे. यात आवश्यक कारणासाठी टॅक्सी आणि रिक्षाही सुरु ठेवाण्याची परवानगी दिली आहे. असून रिक्षा मधून फक्त एका प्रवाशाला परवानगी देणेत आली आहे. ही संचारबंदी मौजमजेसाठी नाही तर स्वतःला सुरक्षित करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
धान्य, भाजीपाला, दूध आणि बँक यांच्याबरोबरच आवश्यक असेल तर टॅक्सी आणि रिक्षांनाही परवानगी दिली आहे. याचबरोबर आत्यावश्यक कारणासाठीच गाडी चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागातील जनजीवर विस्कळीत होऊ नये म्हणून शेतीशी निगडीच दुकाने आणि पशुखाद्य दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेला घाबरुन न जाण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Join :- whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free

Post a comment

0 Comments