आटपाडी येथे अपघातामध्ये गणेश पाटील यांचा जागीच मृत्यू ; वनीकरण विभागामध्ये होते वनरक्षक पदावर कार्यरत 

आटपाडी येथे अपघातामध्ये गणेश पाटील यांचा जागीच मृत्यू ; वनीकरण विभागामध्ये होते वनरक्षक पदावर कार्यरत 


आटपाडी येथे अपघातामध्ये गणेश पाटील यांचा जागीच मृत्यू एक जखमी 
वनीकरण विभागामध्ये होते वनरक्षक पदावर कार्यरत 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथील वनीकरण विभागामध्ये वनरक्षक पदावर कार्यरत असणारे गणेश दत्तात्रय पाटील रा. गळवेवाडी यांचा आटपाडी बायपास रोडवरती जवळे मल्टीपर्पज हॉल जवळ झालेल्या अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला. तर वनपाल पांडुरंग बालटे चे जखमी झाले आहेत. 
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, आटपाडी येथील वनीकरण विभागामध्ये गणेश पाटील वनरक्षक व पांडुरंग बालटे वनपाल म्हणून कार्यरत आहेत. साय. ५.०० च्या दरम्यान ते साई मंदिरकडून आटपाडीकडे दुचाकीवरून  (क्रमांक एम.एच.१०- बी.जे.४०११) निघालेले होते. यावेळी जवळे मल्टीपर्पज हॉल जवळ चुकीच्या बाजूने येणाऱ्या टेम्पोने (क्रमांक एम.एच.१०-झेड- २१८३) त्यांना धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, यामध्ये गणेश पाटील व पांडुरंग बालटे बाजूला फेकले गेले. यावेळी त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले होतो परंतु अपघातामधील गणेश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी ग्रामीण रूग्णालयासमोर नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.
अपघाताची नोंद आटपाडी पोलिस ठाण्यात झाली आहे. आटपाडीत राज्य मार्गाच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. खोदलेले रस्ते व या रस्त्यावरून वाहनाची असणारी गर्दी यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. जखमी पांडुरंग बालटे यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातानंतर मयत गणेश पाटील यांच्यावर  ग्रामीण रुग्णालय आटपाडी शवविच्छेदन करण्यात आले. अपघातातील वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.


दैनिक माणदेश एक्सप्रेस whatasapp वर Free मिळविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a comment

0 Comments