आटपाडी शहरात लॉकडाऊनला नागरिकांचा प्रतिसाद  दुध, किराणा, भाजीपाला, मेडिकल, वगळता बाजारपेठ बंद ; गर्दी होवू नये म्हणून पोलीस यंत्रणा सतर्क

आटपाडी शहरात लॉकडाऊनला नागरिकांचा प्रतिसाद  दुध, किराणा, भाजीपाला, मेडिकल, वगळता बाजारपेठ बंद ; गर्दी होवू नये म्हणून पोलीस यंत्रणा सतर्क


आटपाडी शहरात लॉकडाऊनला नागरिकांचा प्रतिसाद 
दुध, किराणा, भाजीपाला, मेडिकल, वगळता बाजारपेठ बंद ; गर्दी होवू नये म्हणून पोलीस यंत्रणा सतर्क
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : आटपाडी तालुक्यात कोरोनाची साथ  पसरू नये म्हणून प्रशासन प्रतिबंधात्मक उपाय   करत असून त्यास लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अत्यावश्यक सेवा दूध, किराणा, भाजीपाला, मेडिकल दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद आहे. गर्दी होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा सतर्क असून देखील रस्त्यावर वाहनांची ये-जा दिवसभर सुरू असून अतिउत्साही वाहन चालकावर पोलिसांना लाठीमार करण्याची वेळही सातत्याने येत आहे. निर्वाहासाठी गेलेली कुटुंबे खेड्यात परतू लागल्याने येणाऱ्या कुटुंबाची माहिती घेवून त्यांची तपासणी करणे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गावातील पोलीस पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, आदि यंत्रणा या कामात व्यस्त आहेत. तर संचारबंदीचा संधीचा फायदा उठवत काही भाजी व्यापारी व किराणा दुकानदारांनी दरात वाढ केली. अजूनही किरकोळ वाहने रस्त्यावरून फिरत असून जिल्हाबंदी ऐवजी तालुका बंदीची गरज निर्माण झाली आहे. आटपाडी शहरात ग्रामपंचायतीने औषध फवारणी केली आहे. एकंदर सर्व परिस्थिती पाहता आटपाडी शहरात लॉकडाऊनला नागरिकांचा प्रतिसाद दिला आहे.


Join :- whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments