सांगलीतील कोरोनाची संख्या वाढली, इस्लामपुरातील आणखी एकाला लागण ; एकूण २४ जण कोरोना बाधित ; तर ३९ जण आयसोलेशनमध्ये

माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन 
सांगली : सांगलीतील कोरोनाची संख्या वाढली असून आणखी एकाला लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून एकूण २४ जण कोरोना बाधित झाले. 
सांगलीच्या इस्लामपूरमध्ये कोरोनाचा फैलाव सुरुच आहे. 28 मार्च रोजी एनआयव्ही कडून प्राप्त झालेल्या अहवालापैकी एका व्यक्तीचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. उर्वरित दोघांचे स्वाब निगेटिव्ह आले आहेत. ज्या व्यक्तीचा स्वाब पॉझिटिव्ह आला आहे, ती व्यक्ती मिरज येथील आयसोलेशन कक्षामध्ये असून इस्लामपूर येथील ज्या कुटुंबातील रुग्णांचे स्वाब पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांच्याशी संबंधितच सदरची व्यक्ती आहे. असल्याची माहिती सांगलीचे जिल्हाअधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली आहे. 
ज्या इस्लामपूर शहरात कोरोनासगे रुग्ण सापडले आहेत  तेथे आजपासून तीन दिवस संपूर्ण शहरात कडक संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. शहरामध्ये रस्यावर पोलीसांशिवाय कोणीही दिसत नाही याची प्रशासन काळजी घेत आहेत. 

Join :- whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free

Post a comment

0 Comments