काय सांगता... आटपाडीच्या तहसीलदार कार्यालयातून वाळू तस्करांनी ट्रक नेला चोरून 

काय सांगता... आटपाडीच्या तहसीलदार कार्यालयातून वाळू तस्करांनी ट्रक नेला चोरून 


काय सांगता... आटपाडीच्या तहसीलदार कार्यालयातून वाळू तस्करांनी ट्रक नेला चोरून 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : वाळू तस्करांची भिती ना महसूल प्रशासनाला ना पोलिसांना. चक्क तहसीलदार कार्यालय आवारात दंडात्मक कारवाईसाठी आणलेले ट्रक वाळू तस्करांनी चोरून नेला आहे. याबाबत महसूल प्रशासनाच्या वतीने आटपाडी पोलीस ठाणेत गुन्हा नोंदविणेत आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महसूल प्रशासनाने कारवाई करत १२ चाकी अशोक लेलंड कंपनीचा ट्रक क्र. MH-50-0940 हा तहसील कार्यालयाच्या आवारात आणून लावला होता. दि. १० रोजी आरोपी प्रशांत बाळासो शिंदे रा. पळशी ता. खानापूर, जि. सांगली  याने सदरचा ट्रक चोरून नेला आहे. याबाबत महसूल कडून फिर्यादी शंकर नामदेव जावीर याने आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
परंतु तहसिल कार्यालय व पोलीस स्टेशन एकाच आवारात असल्याने ट्रक चोरीला गेल्याने या ट्रक चोरी प्रकरणी कोणतरी सामील असणार असून तहसीलदार कोणावर कारवाई करणार याकडे तालुक्यातील राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील लोकांच्या नजरा लागल्या आहेत. 


दैनिक माणदेश एक्सप्रेस whatasapp वर Free मिळविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a comment

0 Comments