निंबवडे येथे परंपरेला फाटा देत अंतिम संस्कार, गावकऱ्यांच्या प्रबोधनाला यश

निंबवडे येथे परंपरेला फाटा देत अंतिम संस्कार, गावकऱ्यांच्या प्रबोधनाला यश


निंबवडे येथे परंपरेला फाटा देत अंतिम संस्कार, गावकऱ्यांच्या प्रबोधनाला यश
माणदेश एक्सप्रेस न्युज
निंबवडे/राघव मेटकरी : निंबवडे ता. आटपाडी. जि. सांगली येथील तीन दिवसपूर्वी गावातील  सौ. भामाबाई वाघमोडे यांचे निधन झाले होते. वाघमोडे यांचा परिवार मोठा आहे. त्यांना एकूण ६ दीर असून त्यांची वेगवेगळी कुटुंबीय असे सुमारे 150 व्यक्तींचे त्यांचे कुटुंब असून सुद्धा गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी, प्रशासनाणे, सोबत राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त  आदर्श शिक्षक नानासाहेब झुरे यांच्या पुढाकार आणि प्रयत्नातून व अर्जुन वाघमोडे यांच्या सहकार्यातून अंत्यसंस्कार वेळी केवळ 12 व्यक्तींनी हजेरी लावली तर आज तिसऱ्या दिवशी माती सावडताना सुद्धा 10 व्यक्तींनी उपस्थितीत कार्यक्रम केला.
‘कोरोना’ च्या पार्श्वभूमीवर या घरातील लोकांनी दाखवलेली समज आणि त्यांना प्रबोधन करताना कुटुंबियासोबत, नानासाहेब झुरे आणि प्रशासन यांनी घेतलेली मेहनत ‘कोरोना’ रोखण्यात नक्कीच  मैलाचा दगड ठरणार आहे. आज खेड्यात मोठ्या प्रमाणात लोक अशावेळी एकत्र येत असताना त्यांना या सर्व गोष्टी समजून देणे आणि नातेवाईक लोकांची भावनिक समजूत काढणे हे दिव्याचे काम असते. 
निंबवडे गावात अतिशय कमी लोकात हा अंत्यसंस्कार पार पाडला असल्याने पुढील संक्रमण टाळण्यासाठी काळजी घेण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी काळजी येण्याचे तसेच अंतर राखून राहण्याचे आवाहन यावेळी नानासाहेब झुरे यांनी सर्वांना केले.


Join :- whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments