कोरोना व्हायरसचे पुण्यात २ रुग्ण आढळले ; दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निष्पण 

कोरोना व्हायरसचे पुण्यात २ रुग्ण आढळले ; दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निष्पण 


कोरोना व्हायरसचे पुण्यात २ रुग्ण आढळले
दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निष्पण 
पुणे : कोरोना व्हायरसचे पुण्यात २ रुग्ण आढळून आल्याने राज्यात कोरोने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकार ही विशेष खबरदारी घेत आहे. दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. या रुग्णांवर नायडू हॉस्पिटल येथे विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. या दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे.  मात्र नागरिकांनी घाबरुन जाण्याची काहीही कारण नाही असं आवाहन राज्य शासनामार्फत करण्यात आलं आहे. 
कर्नाटक आणि पंजाबमध्ये कोरोना व्हायरसचा प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे भारतात आता कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या  45 वर पोहोचली आहे. कर्नाटकमधील बंगळुरू येथील एका आयटी इंजिनीअरला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. हा कर्नाटकातील पहिला रुग्ण आहे. तर पंजाबमध्येही कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण इटलीहून भारतात परतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे नागरिकांनी यापासून काळजी घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. 


दैनिक माणदेश एक्सप्रेस whatasapp वर Free मिळविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a comment

0 Comments