आटपाडीत आदर्श सोसायटीचे आदर्श काम : अमरसिंह देशमुख


आटपाडीत आदर्श सोसायटीचे आदर्श काम : अमरसिंह देशमुख


माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/सचिन कारंडे : आटपाडी येथील आदर्श को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या वतीने संस्थेचे चेअरमन प्रकाश दैांडे यांच्या हस्ते दि बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेस राज्यस्तरीय उत्कृष्ट बँक वसंतदादा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थापक अमरसिंह देशमुख यांचा सत्कार व आटपाडी तालुक्याचे भाग्यविधाते श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली.


तालुक्यात सहकार चांगल्या प्रकारे काम करीत असून सर्वसामान्यांना सहकाराच्या माध्यमातून कर्जपुरवठा करून त्यांना व्यवसाय वाढीस चालना मिळते. आदर्श को ऑप क्रेडिट सोसायटीचे कमी कालावधीत चांगल्या प्रकारे काम करीत आहे. कर्जपुरवठा करून त्यांनी परतफेड करून घेण्यासाठी संचालकानी लक्ष द्यावे असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी केले.


यावेळी संस्थेचे चेअरमन प्रकाश दौंडे यांनी संस्थेच्या चालू आर्थिक वर्षाचा आर्थिक आढावा घेतला. वसूल भागभांडवल 29 लाख 22 हजार इतकी असून ठेवी 2 कोटी 98 लाख कर्ज वाटप 2 कोटी 51 लाख रुपये आहे. गुंतवणूक 75 लाख इतकी आहे. राखीव व इतर निधी आठ लाख 84 हजार जमा आहे. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे व्हा. चेअरमन राजेंद्र लाटणे यांनी केले तर सूत्रसंचालक दिपक देशमुख यांनी केले. यावेळी संस्थेचे संचालक महेश देशमुख, सर्जेराव राक्षे, महादेव डोईफोडे, नितीन सागर, मोहन पारसे, विलास कवडे, विकास भुते, अरुण साळुंखे, चंद्रशेखर कवडे, संभाजी देशमुख, सुजित सपाटे, नितेश गवळी, सुरज म्हेत्रे, मनोज सपाटे, सुशांत देशमुख, मनीषा शिल्पी, कलेश्वर टकले, मनोहर गुरव, नवनाथ लिगाडे आदी मान्यवर  उपस्थित होते. शेवटी सचिव दत्तात्रय स्वामी यांनी आभार मानले.


 


दैनिक माणदेश एक्सप्रेस whatasapp वर Free मिळविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured