उमदी पोलिसांची गांधीगिरी ; संचारबंदी मोडणाऱ्या नागरिकांच्या गळ्यात मी नालायक, मी समाजाचा दुश्मन, अडकविल्या पाट्या ; फोटो सोशल मिडीयावर  


उमदी पोलिसांची गांधीगिरी ; संचारबंदी मोडणाऱ्या नागरिकांच्या गळ्यात मी नालायक, मी समाजाचा दुश्मन, अडकविल्या पाट्या ; फोटो सोशल मिडीयावर  
माणदेश एक्सप्रेस न्युज
जत : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह जत तालुक्यात संचार बंदी घोषित केली आहे. तरीही नागरिक ऐकत नसल्याने उमदी पोलीसांनी शक्कल लढविली असून संचार बंदी असतानाही बिनकामी फिरणाऱ्या नागरिकांचे "मी नालायक आहे, मी घरी थांबणार नाही,"मी समाजाचा दुश्मन आहे, अशा पाट्या धरून फोटो काढत सोशल मिडियावर टाकण्यास सुरूवात केली केली असून त्यांच्या अनोख्या गांधीगिरीची चर्चा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात चर्चाचा विषय बनला आहे. 
उमदी परिसरात राज्यातून अनेक नवे लोक आले आहेत. त्यात जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव झपाट्याने वाढत आहे. पोलीस,आरोग्य यंत्रणा आवाहन करूनही काही मुर्दाड लोक पुन्ह, पुन्हा रस्त्यावरून फिरत आहेत. त्यामुळे वैतागलैल्या पोलीसांनी नामी शक्कल शोधत बंदी आदेश झुगारून फिरणाऱ्या नागरिकांच्या अब्रुचे खोबरे केले आहे. उमदी पोलीसांनी लढविलेल्या या नव्या प्रयोगामुळे पोलीस ठाणे हद्दीतील रस्त्यावरून फिरणाऱ्या लोंकाची गर्दी बंद झाली आहे. या मोहिमेचे राज्यभर स्वागत करण्यात येत असून अनेकांनी याचे अनुकरन करू लागले आहे.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured