आटपाडीकरांचा ‘जनता कर्फ्यूत’ १०० टक्के सहभाग ; खाजगी व प्रवाशी वाहतूक बंद ; प्रशासनाचा चोख बंदोबस्त 


आटपाडीकरांचा ‘जनता कर्फ्यूत’ १०० टक्के सहभाग
खाजगी व प्रवाशी वाहतूक बंद ; प्रशासनाचा चोख बंदोबस्त 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : संपूर्ण जगात कोरोनोचा वाढता प्रभाव पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 22 रोजी दिवसभर जनतेला कर्फ्यू राबविण्याचे आवाहन केले या आवाहानाला आटपाडी तालुक्यातील जनतेचे उस्फूर्त प्रतिसाद देत या कर्फ्यूत सहभागी झाले. 
शहरांमध्ये जाणाऱ्या राज्य महामार्ग ओसाड पडला होता. तसेच  प्रमुख चौकांमध्ये सन्नाटा दिसून आला. एसटी.बस, प्रवासी रिक्षा, खाजगी वाहतूक पूर्णपणे बंद होती. अत्यावश्यक सेवा वगळता तुरळक वाहने आढळून आली. आटपाडी पोलीस स्टेशनच्या वतीने तसेच आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीच्या वतीने योग्य बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ग्रामपंचायतीच्या वतीने ध्वनिक्षेपकद्वारे जनतेला कर्फ्यू मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येते होते. आटपाडी शहरातील बस स्थानक, मेन बाजार पेठ, बाजार पटांगण, सिद्धनाथ चित्र मंदिर चौक, श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय परिसर, अण्णाभाऊ साठे चौक, पंचायत समिती, आबा नगर चौक. साई मंदिर याठिकाणी पूर्णपणे कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे आटपाडीकरांनी जनता कर्फ्यू मध्ये शंभर टक्के सहभाग नोंदविला.


दैनिक माणदेश एक्सप्रेसच्या बातम्या whatasapp वर Free मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured