सुनीता संभाजी घाडगेची पी.एस.आय पदी निवड ; सुनिता पीएसआय होणारी वाकी (शिवणे) गावची पहिली महिला ; सर्व स्तरातून अभिनंदन 

सुनीता संभाजी घाडगेची पी.एस.आय पदी निवड ; सुनिता पीएसआय होणारी वाकी (शिवणे) गावची पहिली महिला ; सर्व स्तरातून अभिनंदन 


सुनीता संभाजी घाडगेची पी.एस.आय पदी निवड
सुनिता पीएसआय होणारी वाकी (शिवणे) गावची पहिली महिला ; सर्व स्तरातून अभिनंदन 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : वाकी (शिवणे) ता.सांगोला येथील सुनिता संभाजी घाडगे हिची पीएसआय पदी निवड झाली आहे. वाकी (शिवणे) गावातील ती पहिली महिला पी.एस.आय. म्हणून एम.पी.एस.सी. परीक्षेतून उत्तीर्ण झाली. सुनीता हिचे शालेय शिक्षण वाकी व जु. कॉलेजचे शिक्षण बारामती येथे झाले. दहावी व बारावी मध्ये विशेष प्राविण्य प्राप्त करून तिने यश मिळवले होते. त्यानंतर अभियांत्रिकी चे शिक्षण शेळवे पंढरपूर येथे यशस्वीरित्या पूर्ण केले.
परंतु प्रशासकीय क्षेत्रात काम करून समाजाची सेवा करायची इच्छा तिची व तिचे वडील प्रगतशील व आधुनिक शेतकरी व वाकी पतसंस्थेचे चेअरमन व विद्यामंदिर हायस्कूल वाकी चे विद्यमान संचालक संभाजी तुळशीराम घाडगे यांची होती व यासाठी तिने अविरत मेहनत घेऊन गेली दोन वर्षे शिक्षणाचे माहेरघर पुणे येथे अभ्यास करून यश संपादन केले. सुनीता घाडगे हिच्या या घवघवीत यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातून अनेक महिलांना व  मुलींना यापासून प्रेरणा मिळणार आहे तसेच अथक व मनापासून व जिद्दीने कष्ट घेतले की यश मिळतेच हे सुनीताच्या यशावरून दिसून येते.


दैनिक माणदेश एक्सप्रेस whatasapp वर Free मिळविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a comment

0 Comments