बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी स्वेरीचे ऑनलाईन एम.एच.टी.- सी.ई.टी.परीक्षा सराव पोर्टल

बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी स्वेरीचे ऑनलाईन एम.एच.टी.- सी.ई.टी.परीक्षा सराव पोर्टल


बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी स्वेरीचे ऑनलाईन एम.एच.टी.- सी.ई.टी.परीक्षा सराव पोर्टल


माणदेश एक्सप्रेस न्युज


पंढरपूर : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना अनुसरून स्वेरी नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असते आणि या उपक्रमात सातत्य राखत असते. त्याचाच एक भाग म्हणून ‘स्वेरी’ने बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन सी.ई.टी. परीक्षा सराव पोर्टल आणले आहे. स्वेरीने तयार केलेल्या cet.sveri.ac.in या सराव पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून विद्यार्थी फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथेमॅटिक्स या विषयांच्या प्रॅक्टिस टेस्ट्स घर बसल्या सोडवू शकतात. अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली.


येत्या १३ एप्रिल ते १७ एप्रिल २०२० आणि २० एप्रिल ते २३ एप्रिल २०२० या कालावधीत शासनाच्या सी.ई.टी. सेलकडून बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांची सी.ई.टी. परीक्षा घेतली जाणार आहे. अभियांत्रिकीला प्रवेश घेण्यासाठी सदर सी.ई.टी. परीक्षा देणे अनिवार्य असते. या सी.ई.टी. परीक्षेच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना शासनाच्या सी.ई.टी.परीक्षेप्रमाणेच या पोर्टलवरील प्रॅक्टिस टेस्टस् ऑनलाईन पद्धतीने सोडवून सराव करता येतो. त्यासाठी विद्यार्थी इंटरनेटशी जोडलेल्या कॉम्प्यूटर, लॅपटॉप तसेच स्मार्ट फोनचा वापर करून देखील हे सराव प्रश्न सोडवू शकतात. बहुतेकदा विद्यार्थ्यांना पेन व पेपरच्या सहाय्याने परीक्षा देणे सवयीचे असते. त्यामुळे कॉम्प्युटरवर ऑनलाईन परीक्षा देताना विद्यार्थ्यांना ते कठीण जाते. शासनाच्या ऑनलाईन परीक्षेप्रमाणेच हे प्रश्नसंच सोडविण्यासाठी ठराविक वेळ दिलेला आहे. त्या वेळेत विद्यार्थी हे सराव प्रश्न सोडवू शकतात. हे प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे आहेत ज्या मध्ये प्रत्येक प्रश्नाचे उत्तर म्हणून चार पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी योग्य पर्यायाला विद्यार्थी क्लिक करून आपले उत्तर निवडू शकतात व याच पद्धतीने विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. या पोर्टलवर टेस्ट सोडवून झाल्यानंतर आपण दिलेल्या प्रश्नांची चुकीची व बरोबर उत्तरे यांची पडताळणी देखील विद्यार्थी या सराव पोर्टलद्वारे करू शकतात. या सुविधेचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी प्रा. उत्तम अनुसे (मोबा. नं.९१६८६५५३६५) यांच्याशी संपर्क साधावा.


 


दैनिक माणदेश एक्सप्रेस whatasapp वर Free मिळविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a comment

0 Comments