जी.डी. ट्रॅव्हल्स ची  आटपाडी मुंबई स्लिपर सेवा सुरू

जी.डी. ट्रॅव्हल्स ची  आटपाडी मुंबई स्लिपर सेवा सुरू


जी.डी. ट्रॅव्हल्स ची  आटपाडी मुंबई स्लिपर सेवा सुरू
माणदेश एक्सप्रेस न्युज
निंबवडे/राघव मेटकरी : जी.डी. ट्रॅव्हल्स आणि माणदेश च नात हे खूप जून आणि सुदृढ असल्याचं सर्वश्रुत आहे. निंबवडे परिसरातील माणूस दुष्काळी परिस्थिती चा सामना करण्यासाठी मुंबईच्या वाटेला लागला. आजतागायत हा प्रवास बदलत्या प्रवाहसोबत सुरू असून त्याचा गावाकडे येण्याचा आणि पोटापाण्यासाठी मुंबईला जाण्याचा दुवा हा महामंडळच्या बस नेच सुरू होता. 
1998 साली निंबवडे गावातून जी.डी. ट्रॅव्हल्स ची सेवा  ज्ञानेश्वर घनवट, सतीश डंगारे, रमेश डंगारे  यांच्या माध्यमातून सुरू झाली आणि लोकांची सोय झाली. मोठ्या विश्वासाने पुरुष, महिला, मुले यातून प्रवास करू शकतात अस नात निर्माण झालं. टप्याटप्याने ट्रॅव्हल्स अनेक बदल होत गेले अन आता याच जी.डी. ट्रॅव्हल्सची स्लिपर कोच सेवा सुरु करण्यात आली. याचे उद्घाटन निंबवडे येथे मोठ्या धमक्यात करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतिशबाजीने ट्रॅव्हल्स चे स्वागत करण्यात आले. यावेळी जयवंत होळे, सदाशिव मोटे, आबासो वाक्षे, जयवंत सरगर, नामदेव (शेट) मोटे  व निंबवडे पंचक्रोशीतील तमाम नागरिक यांची उपस्थिती होती. आम्ही कॉलेज ला असताना पासून जी.डी. ट्रॅव्हल्सची सेवा अविरत सुरू आहे. बऱ्याचदा या ट्रॅव्हल्स मधून विद्यार्थ्यना आटपाडी पासून मोफत निंबवडे गावात आणल्याचे आम्ही पाहत आलोय. मुंबईला स्लीपर सेवा सुरू झाल्याने गावकऱ्यांची मोठी सोय होणार आहे.
मुकेश देठे, सामाजिक कार्यकर्ते, निंबवडे


दैनिक माणदेश एक्सप्रेस whatasapp वर Free मिळविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a comment

0 Comments