लेंगरेत रस्त्यावर फिरणाऱ्या दुचाकीस्वारांची पळता भुई थोडी ;संचारबंदी लागू काळात लेंगरेत पोलिसांचा कडकडीत बंदोबस्त 


लेंगरेत रस्त्यावर फिरणाऱ्या दुचाकीस्वारांची पळता भुई थोडी ;संचारबंदी लागू काळात लेंगरेत पोलिसांचा कडकडीत बंदोबस्त 


माणदेश एक्सप्रेस न्युज


लेंगरे : लेंगरे ता. खानापूर येथे संचारबंदी लागू काळात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज दि. २५ रोजी  सायंकाळी 5-30 वाजता लेंगरे मादळमुठी रोडवर निर्भया तपासणी मोहिम राबविण्यात आली. कोरोना  विषाणू प्रादृभाव रोखण्यासाठी  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ही जनतेला कळकळीच्या आव्हानाला फार मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर लेंगरे येथे निर्भया पथकानील प्रिती धनवडे, पोलिस अधिकारी तुपे,पोलिस नाईक मोहिते, सिध्दनाथ चव्हाण, नवाज मणेर, मन्सुर शेख, या पथकाने मोकाट फिरणारे लोकांचे व नागरिक यांना तपासणी मोहिम जोरदार राबविण्यात आली. यावेळी लेंगरे भूड - विटा रोडवर फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलीसांनी  नियम शिकवत पळताभुई थोडी केली .


Join :- whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

Previous Post Next Post