खरसुंडी पंचक्रोशीत कडकडीत बंद ; जनता कर्फ्युला उस्फूर्त प्रतिसाद : आठवडा बाजार बंद

खरसुंडी पंचक्रोशीत कडकडीत बंद ; जनता कर्फ्युला उस्फूर्त प्रतिसाद : आठवडा बाजार बंद

खरसुंडी पंचक्रोशीत कडकडीत बंद ; जनता कर्फ्युला उस्फूर्त प्रतिसाद : आठवडा बाजार बंद
माणदेश एक्सप्रेस न्युज
खरसुंडी/मनोज कांबळे : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी खरसुंडी पंचक्रोशीत जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सध्या जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला साथ देत पंचक्रोशीतील मोठा आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला होता. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद होती. नेहमी वर्दळ असलेल्या नाथनगरीत शुकशुकाट होता. पंचक्रोशीतील नेलकरंजी बाळेवाडी, मिटकी, बनपुरी, चिंचाळे, वलवन, घरनिकी, पिंपरी, जांभुळणी, झरे गावे कडकडीत बंद होती.दैनिक माणदेश एक्सप्रेस whatasapp वर Free मिळविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा

Post a comment

0 Comments