आरोग्य केंद्रातच वाढदिवसाची जंगी पार्टी ; ज्यांच्याकडून शिकायची शिस्त, त्यांनीच मोडला प्रतिबंधक कायदा ; पुरंदावडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा अतिउत्साह 


आरोग्य केंद्रातच वाढदिवसाची जंगी पार्टी ; ज्यांच्याकडून शिकायची शिस्त, त्यांनीच मोडला प्रतिबंधक कायदा ; पुरंदावडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा अतिउत्साह 


माणदेश एक्सप्रेस न्युज


माळशिरस/संजय हुलगे : सध्या करोनो व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत असून याबाबत आरोग्य विभाग लोकांना वारंवार सूचना देत आहे. यासाठी ठराविक अंतर, मास्क व पाच व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊ नये यासाठी प्रबोधन करीत आहे. चार लोकांपेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नयेत विनाकारण गर्दी करू नये या कारणास्तव पोलिसांनी दंडुका हाती घ्यावा लागला असुन यासाठी अनेक ठिकाणी नागरिक स्वयंस्फूर्तीने सतर्कता घेत आहेत. प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करीत असतानाच खुद्द प्रशासकीय यंत्रणेचा महत्त्वाचा भाग समजला जाणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मात्र वेगळाच करिष्मा जनतेसमोर ठेवला आहे. यामुळे  बेशिस्त कर्मचार्‍यांवर कोणती कारवाई होणार याकडे लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.


आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत असताना पुरंदावडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी कोणतीही सुरक्षितता न पाळता अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन कार्यक्रम करण्यासाठी बंदी असताना वाढदिवस साजरा केला. याबाबत पुरंदावडे येथील ग्रामस्थ हरी पालवे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, पुरंदावडे प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ मार्च रोजी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत वाढदिवसाचे सेलिब्रेशन साजरे केले. यावेळी केक कापला. यामुळे खुद्द वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली परतवार यांच्यासह १३ ते १४ आरोग्य कर्मचाऱ्यांनी करोनो व्हायरस ची मोठी भिती असताना बेशिस्तपणे वर्तन केले आहे. यामुळे आरोग्य केंद्राच्या आरोग्यसुविधा रामभरोसे असल्याच्या दिसत आहे. सर्वत्र दुकान बंद असताना आरोग्य केंद्रामध्ये केक कसा आला? चार व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती या कार्यक्रमात कशा सहभागी झाल्या? या व्यक्तींनी स्वतःची सुरक्षितता लक्षात घेतली होती का? प्रशासनाने घालून दिलेले नियम हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाळळे का? असे अनेक प्रश्न सध्या जनतेतून पुढे येत असून अशा गंभीर परिस्थितीतून नागरिक जात असताना प्रशासकीय आदेशाची थट्टा करणाऱ्या आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का? अशा अनेक प्रश्नांवर सध्या जनतेतून चर्चा सुरू आहे.


Jion ; Free Whatappp दैनिक माणदेश एक्सप्रेस


 


 


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured