सांगलीत आढळले ४ ‘कोरोना’ रुग्ण ; सौदी अरेबियातून हज यात्रा करून आले होते

सांगलीत आढळले ४ ‘कोरोना’ रुग्ण ; सौदी अरेबियातून हज यात्रा करून आले होते


सांगलीत आढळले ४ ‘कोरोना’ रुग्ण ; सौदी अरेबियातून हज यात्रा करून आले होते
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : सांगलीत "कोरोना' बाधित चौघे रूग्ण आढळले असून चौघेही इस्लामपूरचे असून नुकतेच सौदी अरेबियातून हज यात्रा करून आले होते.  चौघांचा रिपोर्ट "पॉझिटीव्ह' आल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चौघांना मिरजेतील सिव्हील हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. 
तीन दिवसापूर्वी 12 संशयितांना आयसोलेशन वॉर्डात दाखल केले होते. त्यापैकी एक विटा, आष्टा, जत परिसरातील होते. त्यांचे अहवाल तीन दिवसापासून प्रलंबित होते. त्यांचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले असतानाच  इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील चौघांना कोरोना झाल्याची धक्कादायक बातमीने खळबळ माजली आहे. चौघेजण नुकतेच सौदी अरेबियातून हज यात्रा करून आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी चौघांना कोरोना झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्या चौघांना मिरजेतील सिव्हील हॉस्पिटलमधील स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 


Join :- whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments