माळशिरस मनसेच्या वतीने पोलीस प्रशासनाला सॅनेटायझर व स्पिरिट भेट

माळशिरस मनसेच्या वतीने पोलीस प्रशासनाला सॅनेटायझर व स्पिरिट भेट


माळशिरस मनसेच्या वतीने पोलीस प्रशासनाला सॅनेटायझर व स्पिरिट भेट
माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : सध्या जगभरात कोरोनाचा हाहाकार माजलेला असताना सर्वसामान्य जनता सुखी व निरोगी रहावी यासाठी दिवस-रात्र कष्ट करणारे पोलीस बांधव यांनाही कोरोनाची लागण होऊ नये म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना माळशिरस तालुक्याच्या वतीने सॅनेटायझर ब स्पिरीट भेट देण्यात आले. यावेळी माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  विश्वंभर गोल्डे, पोलीस उपनिरीक्षक शशिकांत शेळके, राहुल झुंझुर्डे , मनसे माढा लोकसभा अध्यक्ष  आप्पासाहेब कर्चे, मनसेचे माळशिरस तालुका अध्यक्ष  सुरेशभाऊ टेळे, नगरसेवक अशोक वाघमोडे, मनसे शहर अध्यक्ष सुरेश वाघमोडे, भाऊसाहेब टेळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
माळशिरस शहरामध्ये जनतेने कर्फ्यूचे पालन केले. कोरोना सारख्या विषारी विषाणू रोखण्याकरता पोलीस प्रशासनाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. तर पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्डे, नायब तहसीलदार तुषार देशमुख व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पाच वाजता टाळ्या वाजून सर्व जनतेचे अभिनंदन केले. अशा कर्तव्यदक्ष पोलीस प्रशासनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुरक्षा म्हणून सॅनेटायझर व स्पिरिट भेट देण्यात आले.


Join :- whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments