सापडलेले १७ हजार केले पोलिसांच्या स्वाधीन ; शुभम भारतगॅसच्या कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा


सापडलेले १७ हजार केले पोलिसांच्या स्वाधीन ; शुभम भारतगॅसच्या कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा 
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : सापडलेले पैसे सहसा कुणी परत देत नाही. त्याला पैसे नीट ठेवता येत नाहीत का, आपण काय चोरी केली आहे काय? अशी उत्तरे सापडलेले पैसे मिळाल्यावर लोकांची प्रतिक्रिया असते. परंतु नेमके याच्या उलटे म्हसवड ता. माण, जि.सातारा येथे घडले असून शुभम भारतगॅसच्या कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे पैसे पोलीसाकडे जमा केले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुभम भारतगॅसमध्ये कामाला असलेले कमर्चारी तानाजी जाधव चे संचारबंदी काळात आपले कर्तव्य बजावत असताना सातारा- पंढरपूर रस्त्यावर कोणाचे अनोळखी इसमाचे सुमारे १७ हजार रुपये पडले होते. ते पैसे जाधव यांनी एस.टी. स्टँड परिसरात ड्यूटीवर असलेले पोलिसांचे हवाली केले व ज्याचे असतील त्यांना देणेची विनंती केली. या प्रामाणिकपणा बद्दल तानाजी जाधव याचे इंजि. सुनील पोरे, विशाल गोंजारी, पत्रकार, पोलीस, परिसरातील नागरिक यानी अभिनंदन करून कौतुक केले.


Join whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad