माळशिरस येथे संचारबंदीमध्ये फिरणाऱ्यावर गुन्हे  तर काहींना चोप

माळशिरस येथे संचारबंदीमध्ये फिरणाऱ्यावर गुन्हे  तर काहींना चोप


माळशिरस येथे संचारबंदीमध्ये फिरणाऱ्यावर गुन्हे  तर काहींना चोप
माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : माळशिरसमध्ये संचारबंदी असताना ही मोकाट फिरणाऱ्या नागरिक व वाहनचालकांना माळशिरस पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले. गेल्या दोन दिवसात लोकांना एकत्र जमून सार्वजनिक उपद्रव करून व बेदरकारपणे मानवी जीवितास व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करून संसर्ग पसरवण्याचे घातक कृती करून  जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या  रोग प्रतिबंधक कायदा कलम 2, 3, 4 राष्ट्रपती आपत्ती व्यवस्थापन कायदा 51 ब अन्वये निर्गमित केलेल्या आदेशाचे अवज्ञा केल्याच्या कारणास्तव अक्षय पाटील, हसन  मुलाणी, महेश कापरे सर्व रा. माळशिरस तर सदाशिवनगर येथील महादेव वाघमोडे व शंकर वाघमोडे या दोन पैलवानावर  माळशिरस पोलिसात गुन्हे दाखल  करण्यात आले असल्याची माहिती माळशिरस पोलिसांनी दिली. पोलीस पथकाने रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकां चोप देत  कारवाईचा जोरदार  बडगा उगारला.दिवसेंदिवस कोरोनो च्या बाबतीत गंभीरता वाढत असल्यामुळे पोलिसांना कारवाईचा बडगा उगारावा लागत आहे. पुढील सूचना येईपर्यंत नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये, सूचनांचे योग्यरीतीने पालन करावे, नागरीकांनी घरातच थांबुन प्रशासनाला सहकार्य करावे. अन्यथा विनाकारण रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी येणार्या  नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
विश्वंभर गोल्डे 
पोलीस निरीक्षक,माळशिरस


Join :- whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस FreePost a comment

0 Comments