जमावबंदी असताना आटपाडीच्या भाजी मंडई परिसरात गर्दी करणाऱ्या नागरिकांना पोलिसांचा लाठीचा प्रसाद ; विनाकारण फिरणाऱ्या अतिउत्साही नागरिकांना झोडपले


जमावबंदी असताना आटपाडीच्या भाजी मंडई परिसरात गर्दी करणाऱ्या नागरिकांना पोलिसांचा लाठीचा प्रसाद ; विनाकारण फिरणाऱ्या अतिउत्साही नागरिकांना झोडपले
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : जमावबंदी आदेश असताना आटपाडी भाजी मंडई परिसरात गर्दी करणाऱ्या पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला. इस्लामपूर मध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले नंतर पोलिसांनी गांभीर्य ओळखून शहरात ठीक ठिकाणी भेट देत विनाकारण फिरणाऱ्या अतिउत्साही नागरिकांना झोडपून काढले. लॉक डाउनलोड असताना दूध, भाजीपाला वगळण्यात आल्याचे प्रशासनाने जाहीर केले असले तरी भाजी मंडई व रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्यांची गर्दी दिसू लागल्यावर गर्दी वाढतच गेली. रस्त्याकडेला लावलेली आडवी तिडवी वाहने, होणारी गर्दी, ग्राहकांचे गोंधळलेली स्थिती व नियम डावलून किराणा मालाची उघडलेली दुकाने या पार्श्वभूमीवर तहसीलदार सचिन लंगुटे, ॲड. धनंजय पाटील, ग्रामसेवक दत्तात्रय गोसावी, ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी भाजीमंडई येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. खबरदारी म्हणून मंडईतील व्यापाऱ्यांना सुरक्षित अंतर ठेवा, मास्क घातल्याशिवाय बसू नका, विनाकारण गर्दी करू नका, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सहकार्य करा अशा सूचना दिल्या. याचवेळी किराणा दुकानदाराना ताकीद देण्यात आली. रस्त्यावर गर्दी वाढत गेल्याने तहसीलदार सचिन लंगुटे यांनी पोलिसांना पाचारण करून गर्दी हटविण्यास सुरुवात केली. 
भाजी विक्री करणाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी मुर्दाडपणापणाने बाजारात थांबणाऱ्या काही नागरिक व बाहेरून येणाऱ्या गाड्या कुठून आला? कुठे जाणार आहात? चौकशी करून या रस्त्यावर परत यायचे नाही? असा सज्जड दम पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे देत होते. नागरिकांची ऐकण्याचे मानसिकता नाही चे लक्षात आल्यावर पोलिसांनी दंडुकेशाहीचा वापर करून गर्दी पांगवली. काही वेळातच बसस्थानक परिसर, सांगोला चौक, बाजारपेठ, पोलीस स्टेशन चौक, आदी परिसर निर्मनुष्य झाला. 
पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाटील यांनी ही कारवाई दिवसेंदिवस कडक करणार असल्याचे सांगितले. आपल्या कुटुंबाचा विचार करून कोणीही विनाकारण घरावर पडू नये, नागरिकांनी सहकार्य करावे अन्यथा नाईलाजाने पोलिसांना बळाचा वापर करावा लागेल असे स्पष्ट केले.


Join :- whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured