Type Here to Get Search Results !

कोरोना बाधित रूग्णांची प्रकृती स्थीर ;  दवाखाने बंद ठेवल्यास खाजगी डॉक्टरांवर कठोर कारवाई होणार ; - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे ;  वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी काम टाळल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई


कोरोना बाधित रूग्णांची प्रकृती स्थीर ;  खाजगी दवाखाने बंद ठेवल्यास डॉक्टरांवर कठोर कारवाई होणार ; जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे ;  वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी काम टाळल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई


माणदेश एक्सप्रेस न्युज


सांगली : सांगली जिल्ह्यात 9 केसेस कोराना बाधित असल्या तरी त्यांची प्रकृती स्थीर आहे. त्यांच्यात कोणतीही नवीन लक्षणे आढळली नाहीत. वैद्यकीय अधिकारी जातीने लक्ष देत आहेत व त्यांच्यावर उपचार करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये व पॅनिक होऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे म्हणाले, सांगली जिल्ह्यात एकूण 49 लाकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी 9 रूग्णाचे स्वॅब पॉझीटीव्ह आले आहेत तर उर्वरीतांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. 12 व्यक्तींचा रिपोर्ट अद्यापही अप्राप्त आहे, तो उद्यापर्यंत प्राप्त होईल. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन शर्तीचे प्रयत्न करीत आहे. याला सर्वांनी साथ देणे आवश्यक आहे. 


खाजगी दवाखाने बंद ठेवल्यास नोंदणी रद्द होणार
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे म्हणाले, काही खाजगी दवाखाने बंद रहात आहेत याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर महाराष्ट्र मेडीकल कौन्सीलकडील त्यांची नोंदणी रद्द करण्याइतपत जिल्हा प्रशासन कारवाई करू शकते. याची जाणीव डॉक्टरांनी ठेवावी. कटू कारवाई टाळण्यासाठी डॉक्टरांनी नोबल प्रोफेशनमध्ये आपण काम करत आहोत याची जाणीव ठेवून अशावेळी लोकांच्या आरोग्य सेवेसाठी पुढाकार घेऊन काम करणे अपेक्षित आहे. त्यामुळे दवाखान्यांना कुलपे लावून बंद ठेवू नयेत. अशाने आपली प्रतिमा चांगली राहणार नाही. शासकीय यंत्रणेतील डॉक्टरांनी अशा प्रसगांमध्ये पुढे येऊन काम करावे व खाजगी डॉक्टरांनी मागे रहावे हे निश्चितच खेदजनक आहे. अशा प्रसगांमध्ये कोणी खाजगी डॉक्टर त्यांचे दवाखाने बंद ठेवत असतील व त्याचे पुरावे प्रशासनाला मिळत असतील तर प्रशासन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यावर कचरणार नाही. शिस्तभंगाची कारवाई तात्काळ केली जाईल. 


वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी काम टाळल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई
काही डॉक्टर कर्मचारी दवाखान्यात येत नाहीत या सबबीवर दवाखाने बंद ठेवत आहेत. याबाबत बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे म्हणाले, आपण आपल्या दवाखान्याची ओळखपत्रे कर्मचाऱ्यांना द्यावीत. गरज पडल्यास हॉस्पीटलचे संचालक व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या संयुक्त सहीचे ओळखपत्र देण्याचाही विचार सुरू आहे. पोलीस सोडत नाहीत असे कारण पुढे करून वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी बाहेर पडत नसतील तर त्यांच्यावरही आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. यावेळी सोशल मीडियातून येणाऱ्या पोस्ट खातरजमा केल्याशिवाय फॉरवर्ड करू नयेत याबाबत दक्षता घेण्याचेही आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे.


Join :- whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies