आटपाडीत कलिंगडाचे मोफत वाटप ; साडेतीन एकरामध्ये केली होती लागवड ; शेतकऱ्यांनी शेतातून कलिंगड घेवून जाण्याचे नागरिकांना केले होते आवाहन

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : संपूर्ण देशासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे सर्वत्र बाजारपेठा बंद आहेत. याचा परिणाम मागणी नसल्याने साडेतीन एकर क्षेत्रांमध्ये लावलेल्या कलिंगडचे मोफत वाटप करण्यात आले. शेतकरी गुलाबराव विष्णू पाटील व शरद पाटील यांनी साडेतीन एकर मध्ये कलिंगड लागवण केली होती. मात्र गेल्या आठवड्यात सर्वच चित्र बेरंग झाले. व्यापारी फिरकला नाही. औषध, खत फवारणी, मजुरी, पाण्याची पाळी याचा खर्च बसू लागला. जमिनीची मशागत, औषधे, खते, मजुरी यासाठी एक लाख रुपये खर्च आला. मात्र कोरोना व्हायरसमुळे मागणी थांबली. दरही गडगडले. स्थानिक बाजारात खपही नसल्याने कलिंगडाचे नुकसान न करता काळेमळा येथे असलेल्या साडेतीन एकर क्षेत्रांमध्ये 45 टन माल असलेल्या शरद पाटील, गुलाबराव विष्णू पाटील या शेतकऱ्यांनी कलिंगडाचे नेण्याचे आवाहन केल्यानंतर शहरात ही बाब समजताच नागरिकांनी जमेल तसे कलिंगड नेले. मात्र तापलेल्या रखरखत्या उन्हात लाल भडक, गोड अशा कलिंगडाने अनेकांच्या जीवाला गारवा मिळाला. मात्र याचा शेतकऱ्यांना फायदा  झाला नाही पण नागरिकांनी कलिंगड नेल्याचा आनंद मात्र शरद पाटील व गुलाबराव विष्णू पाटील यांच्या चेहऱ्यावर समाधान देऊन गेला.

Join :- whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free

Post a comment

0 Comments