आटपाडी भाजी मंडई मध्ये चढ्या दराने भाजीपाला विक्री ; कोरोनो’च्या धास्तीने गेल्या दोन दिवसापासून शहरातील भाजी मंडई होती ठप्प


आटपाडी भाजी मंडई मध्ये चढ्या दराने भाजीपाला विक्री 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : ‘कोरोनो’च्या धास्तीने गेल्या दोन दिवसापासून शहरातील भाजी मंडई ठप्प असल्याने भाजी विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. शनिवार हा आठवडा बाजार असल्याने अनेक शेतकरी, व्यापारी खरेदी-विक्रीसाठी येत असतात. कोरोना व्हायरस देशभरासह महाराष्ट्रात पसरत असून अनेक लोकांनी त्याची धास्ती घेतली असून या पार्श्व्भूमीवर आटपाडी ग्रामपंचायतीने बाजार स्थगित केला होता. पैशापेक्षा जीवन अनमोल आहे, म्हणून भाजी विक्रेत्यांनी दोन दिवस मंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने शहरातील नागरिकांना भाजीपाला मिळणे फार कठीण झाले होते.
 ग्रामीण भागातील फिरत्या भाजी-पाला विक्रेत्यांनी नाथबाबा मंदिरासमोरील रस्त्याकडेला गाड्या लावून तर काही जणांनी ठाण मांडून बसलेली समजताच नागरिकांनी धाव घेऊन गर्दी केली होती. मात्र शहरात कर्फ्यू उठताच भाजी मंडई मध्ये आलेल्या शेतकरी, व्यापाऱ्यांनी ठाण मांडले. यावेळी भाजी मंडई परिसर गर्दीने फुलून गेला. खरेदीसाठी आलेल्या नोकरदार वर्ग, युवक, युवती, महिला वर्गासह तोबा गर्दी झाल्याने मंडई परिसर फुलून गेला. शहर बंद असलेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन इतर वेळी पाच रुपये मिळणारे पालेभाजी दहा रुपयाला विकले गेले व इतर भाज्या चढ्या दराने विक्री केली गेल्याने ग्राहक वर्ग नाराज झाला. पण भाजीविक्रेता आपल्या भाजीपाल्याचं मार्केटिंग करून आनंदात गेला तर  नागरिकांचा आठवडाभराचा भाजी चा प्रश्न अखेर मिटला.


 


Join :- whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured